पीकविम्याची रक्कम पूर्वीप्रमाणे बँकखात्यातूनच द्या…..रघुनाथ शेंडे

0
954
Google search engine
Google search engine

सिंदेवाही : दरवर्षी किसान क्रेडिटद्वारे शेतकऱ्यांना रक्कमेचा धनादेश लाभार्थ्यांच्या बचत खात्यात जमा करून देण्यात येत होता. परंतु, यावर्षी को-ऑपरेटिव्ह बँकेने नवीनच नियम काढला असून, पीकविम्याची रक्कम एटीएममधून काढण्याची सक्ती केली आहे. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांकडे एटीएम नाही, कुणाजवळ असेल तर त्यांना समजत नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग या अटीमुळे हैराण झाला असून, पीकविम्याची रक्कम पूर्वीप्रमाणे बँकखात्यातूनच देण्याची मागणी शेतकरी- शेतमजूर महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ शेंडे यांनी केली आहे. यासंदर्भात को-ऑपरेटिव्ह बँकेचे शाखाधिकारी बोबडे यांच्या मार्फ तीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊ णकर यांना देण्यात आले आहे.

पीकविम्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा करून गरजेनुसार बळीराजा पैसे काढून आपले काम चालवत असते. परंतु, बँकेच्या एटीएमच्या या जाचक अटीमुळे बळीराजापुढे बिकट समस्या निर्माण होऊन अडचणी वाढल्या आहेत. बरेचसे शेतकरी हे अशिक्षित आहेत. तसेच एटीएममधून पैसे काढणे म्हणजे त्यांच्यासाठी धोक्याचे आहे. तेव्हा किसान क्रेडीट कार्ड पीकविम्याची रक्कम खरीप हंगामाआधी देण्यात यावी व तेही विड्रॉलद्वारेच खात्यातून देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी महासंघाचे उपाध्यक्ष सुदाम खोब्रागडे, लोकमित्र गेडाम, अशोक तुम्मे, वासुदेव बोरकर, सुभाष कोलप्याकवार, वामन सोरते, ऋषी लोखंडे, विनायक, सोमा भरडकर, गणपत मस्के, रामदास भरडकर व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.