दोन दिवसात एकाही अर्जाची उचल नाही – ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

0
574
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे तालुक्यातील ५ ग्रा.पं. मधील ५ सदस्यपदाकरीता निवडणुक
चांदूर रेल्वे – Shahejad Khan :-
माहे जूलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे १४६ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट निवडणुकी करीता राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच घोषीत केलेला आहे. ३१ मे पासुन अर्ज उचलण्याची व भरण्याची तारीख सुरू झाली असून चांदूर रेल्वे तालुक्यात ५ ग्रामपंचायतच्या ५ सदस्यपदाकरीता पोटनिवडणुक होणार आहे. यासाठी पहिल्या व दुसऱ्या दिवशी एकाही अर्जाची उचल झाली नाही.
  ग्रा.पं. निवडणुकीसाठी नाम निर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करण्याची वेळ ३१ मे ते ६ जुन दुपारी ३ वाजे पर्यंत आहे. नाम निर्देशन पत्रे छाननी करण्याचा दिवस ७ जुन आहे. तर नाम निर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतीम दिवस १० जुन दुपारी ३ वाजता पर्यंत असेल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द १० जुन रोजी दुपारी ३  वाजता नंतर होईल. प्रत्यक्ष मतदान २३ जुन रोजी असून सकाळी ७ पासून ते सायंकाळी साडे ५ पर्यंत राहील. मतमोजणी २४ जुन रोजी होईल. तर जिल्हाधीकारी कार्यालय मार्फत निवडणूकीच्या निकालाची अधि सूचना प्रसिद्ध करण्याची अंतीम दि २७ जुन असेल.
       चांदुर रेल्वे तालुक्यात ५ गावात ग्रामपंचायत सदस्यपदाकरीता निवडणूक घेण्यात येईल. त्यानुसार  टोंगलाबाद वार्ड क्रं. १, निमगव्हाण वार्ड क्रं. २, टेंभुर्णी वार्ड क्र. २, राजना वार्ड क्र. २ व मांजरखेड कसबा वार्ड क्रं. ३ साठी वरील कालावधीत पोट निवडणूक घेण्यात येत आहे. दोन दिवसात एकानेही अर्ज उचल केली नाही.