निलेश मेश्राम / देवरी :-
 काल दिनांक 1 जून ला सकाळी ७.३० वा दरम्यान घरा शेजारी पाहुनी म्हणून काकाच्या घरी  आलेल्या एका  अल्पवयीन  चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना देवरी येथे घडली अश्विन याने त्या मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला,
या  प्रकरणी देवरी पोलिसांनी अश्विन मेश्राम या नराधमाला अटक केली आहे.  मुलीच्या आईच्या तक्रारी वरून देवरी पोलिसांनी अश्विन मेश्राम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, भांदवी ३७६पोस्को कायदा ४,८,१२ अन्वेय गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास देवरी चे ठा नेदार कमलेश बच्छाव करीत आहेत, या घटनेत देवरी शहरातील लोकांमध्ये अश्विन मेश्राम यांच्या विरोधात असंतोष फोफावत आहे,  या बाबत सविता ताई पुराम,नगराध्यक्षा सौ,कौशल्य कुंभरे तसेच सर्व महिला आघाडी प्रमुख यानि  नराधमावर कडक कारवाही करिता पोलीस स्टेशन देवरी येथे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.  तसेच आरोपी अश्विन मेश्राम याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला त्यामुळे संत रविदास बाबा सार्वजनिक मंदिर समितीने अश्विन मेश्राम चा निषेध केला , ही घटना समाजाला काळीमा फासणारी असून असून असे कृत्य पुन्हा होऊ नये म्हणून या करिता आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी चर्मकार समाजातर्फे करण्यात आली,या निषेधार्थ उद्या सोमवारी (३) देवरी बंद चे आवाहन करण्यात आले आहे