मनरेगा विभागातील कर्मचार्यांची कामाप्रती दिरंगाई – कार्यलयीन वेळेत कर्मचारी गैरहजर

0
1280
Google search engine
Google search engine

निलेश मेश्राम / देवरी :-

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा आदीवासी बहुल अतिदुर्गम व नक्सलग्रस्त असून शासनाने आदीवासी बहुल व नक्षलग्रस्त तालुक्यासाठी अनेक प्रकारच्या चांगल्या योजना आखल्या आहेत, मात्र देवरी येथील पंचायत समिती कार्यलयातील मनरेगा विभागातील कर्मचारी हे कार्यलईन कामाच्या वेळेत गैरहजर राहत असल्याने व कामात दिरंगाई असल्याने ग्रामपंचयत व कंत्राटदाराणा कार्यलईन कामे करून घेताना त्रास सहन करावा लागतो,मात्र याकडे अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे सर्वसामान्य नागरिकांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही,यासाठी जवाबदार कोण ?
अधिकारी की कर्मचारी अशी चर्चा तालुक्यात जोर धरत आहे
पंचायत समिती कार्यालय हे  नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे कार्यालय मानले जाते, या कार्यलयातून अनेक योजना राबविल्या जातात, योजनेची योग्यप्रकारे अमलबजावणी करण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यचे असते, शासकीय कार्यल्यात कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतन शासनाकडून दिले जाते , मात्र पंचायत  समिती देवरी येथील मनरेगा विभागातील कर्मचारी सतत गैह्जर असतात, ग्राम पातळीवर सरपंच कंत्राटदार व ग्रामीण नागरिकांना कार्यलईन कामे करण्यासाठी देवरीला उपविभागीय कार्यालय असल्यामुळे यावे लागते परंतु ग्रामीण भागातील व परिसरातील नागरिक आपली अडचण व समष्या घेऊन प.स कार्यालयात जातात तेव्हा येथील कर्मचारीच गैरहजर असल्याने नागरिकांना काम न करता परतावे लागते,
या मध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग तर नाही अशी चर्चा सुरू असून ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन कराव लागतो कर्मचारी उपस्थित असल्याने नाईलाजाने कार्यलईन कर्मचाऱ्यांना मोबाईल वरून सम्पर्क करावा लागतो,तेव्हा मी सुटीवर आहे,बाहेर आहे,मिटटिंग मध्ये आहे असे अनेक उतर दिले जातात,मात्र यासंदर्भात वरिस्ट अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत की अधिकार्याचेच आशीर्वाद कर्मचाऱ्यांवर आहे अशी चर्चा सुरू आहे