डाँ करंजकर दरोडा प्रकरणातील दरोडेखोर ए.डि.एस. पथकाच्या ताब्यात

621

डाँ करंजकर दरोडा प्रकरणातील दरोडेखोर ए.डि.एस. पथकाच्या ताब्यात

उस्मानाबाद /प्रतिनिधी –
उस्मानाबाद येथील डाँ सुरेश करंजकर यांच्या घरावर दरोडा टाकलेल्या दरोडेखोरांना ४८ तासात उस्मानाबाद येथील दरोडा प्रतिबंधक पथकाने पकाने दोन संशयीताना ताब्यात घेतले आहे.
उस्मानाबाद येथील वरुडा रोडवर डाँ सुरेश करंजकर यांचे सुश्रुत हाँस्पिटल आहे.व हाँस्पिटल जवळच त्यांचे घर आहे दोन दिवसापूर्वी डाँ करंजकर यांच्या घरावर रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरात धूडघूस घालून डाँ करंजर व त्यांच्या पत्निला मारहाण केली होती.या घटनेची तक्रार आनंद नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक आर .राजा.यांच्या आदेशाने उस्मानाबाद येथील दरोडा प्रतिबंधक पथकाकडे देण्यात आला होता.
या प्रकरणात उस्मानाबाद येथील दरोडा प्रतिबंधक पथकाने फक्त ४८ तासात या घटनेचा छडा लावला असून दोन संशयीत दरोडेखोरांना ए.डि.एस.पथकाने ताब्यात घेऊन पूढिल तपासकामी आनंद नगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
हि कार्यवाही दरोडा प्रतिबंधक पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश मुंढे, पोलीस हेड काँन्टेबल वाहेद मुल्ला, पोलीस नाईक शौकत पठाण, भोळे ,वसीम पठाण , भांगे ,भोजगुडे ,कावळे,टेळे,टोंपे,शिंदे,तिळगुळे,थोरात,कासारे,मस्के,काळे , कवडे यांनी हि धाडशी कार्यवाही केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।