विजयभाऊ वडेट्टिवार ब्रम्हपुरी-सिंदेवाही विंधानसभा क्षेत्र यांच्या वतीने जामा मास्ज़िद सिंदेवाही येथे इफ्तार पार्टी चे आयोजन

0
514
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- 02/06/2019 रोज रविवारला जामा मास्ज़िद सिंदेवाही येथे माननीय विजयभाऊ वडेट्टिवार आमदार ब्रम्हपुरी-सिंदेवाही क्षेत्र तथा उप-गतनेते विधीमंडल महाराष्ट राज्य यांच्या वतीने इस्लाम धर्मीय मुस्लिम समाजाचा पवित्र माह रमजान च्या शुभपर्वावर नियमित दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा “दावत-ए-इफ्तार” इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते..

   या इफ्तार पार्टिमध्ये विशेष करुण त्यानी जामा मास्ज़िद सिंदेवाहि येथे आपल्या सर्व कार्यकर्त्यासह प्रामुख्याने उपस्थिति दर्शविली या शुभपर्वाच्या प्रसंगी सर्वप्रथम अब्दुल कादिर मुशाहीदी हाफ़िज़-इमाम (धर्मगुरु) जामा मास्ज़िद सिंदेवाही यांचे सत्कार विजयभाऊ वडेट्टिवार आमदार ब्रम्हपुरी-सिंदेवाहि विंधानसभा क्षेत्र यानी केले. तसेच इंतेजामिया कमेटी जामा मास्ज़िद सिंदेवाहि च्या वतीने सन्मानार्थ माननीय विजयभाऊ वडेट्टिवार आमदार साहेबांचे पुष्पगुच्छ आणि शाल देवून सत्कार कमेटिचे इस्माइल अहमद शेख अध्यक्ष इंतेजामिया कमेटी जामा मास्ज़िद सिंदेवाही आणि नासिर जमाल अंसारी सचिव इंतेजामिया कमेटी जामा मास्ज़िद सिंदेवाही यानी केले. त्याच प्रमाणे वेळेची महत्वता जपत मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत समाजाच्या वतीने करण्यात आले.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंतेजामिया कमेटिचे सचिव नासिरअंसारी यानी केले प्रास्ताविकात त्यानी सिंदेवाही-लोनवाही परिसरातील मुस्लिम समाजाचा सयुक्त असलेला मुस्लिम कब्रिस्तान (दफ़नभूमि) विषयी आवश्यक असलेल्या बाबीनची पुर्तत: करुण देण्याचा प्रस्ताव मांडला. इफ्तार पार्टी च्या आयोजनार्थ प्रसंगी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना सर्व समाजाविषयी सामाजिक दायित्व निभावताना आपल्या शब्दातुंन आपली आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाची विचारधारा सुद्धा व्यक्त केली. इस्लाम धर्मीय मुस्लिम समाजाविषयी असलेला विकासात्मक दुरदृष्टिकोंन, शैक्षणिक प्रवाहात मुस्लिम समाजाची भागीदारी कश्या पद्धतीने वाढविता येईल, सामाजिक परिवर्तनाच्या लाटेत मुस्लिम समाजातील तरुनाना कश्या पद्धतीने समाविष्ठ करता येईल, इत्यादि विषयावर मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे इंतेजामिया कमेटीच्या वतीने जो प्रस्ताव ठेवण्यात आलेलता आहे त्या विषयावर बोलताना, मागील पाँच वर्षाच्या काळात मुस्लिम कब्रिस्तान सिंदेवाहि-लोनवाहि करिता स्थानिक आमदार निधि द्वारे प्रथम 6,50,000/- सीमेंट कांक्रीट रोड़ तसेच नुकतेच संरक्षण भींत करिता 7,00,000/- अश्या पद्धतीने एकुन 13,50,000/- रुपयाची निधि उपलब्ध करुण समाजाच्या विकासात सहकार्य केले आहे. अशी माहिती सुद्धा उपस्थित समाजबाँधवाना दिली. तसेच प्रास्तावित मागणी विषयी त्यानी स्थानिक नगरसेवक युनुसभाई शेख यांचेद्वारे माहिती घेवून मुस्लिम समाज सभागृह आणि उर्वरित संरक्षणभींत याकरिता येणाऱ्या काळात युनुसभाई शेख यानी पाठपुरावा करावा अशी सूचना सुद्धा केली. बालगोपालाना आणि बालरोज़ेदाराणा गोड शुभेच्छा देत सर्वाना पवित्र ईद-उल-फितर (रमजानई) च्या शुभेच्छा देत आपल्या वानीला विराम दिला..

  प्रसंगी या इफ्तार पार्टी च्या आयोजनात विशेषतः इंतेजामिया कमेटिचे सर्व पदाधिकारी रसुलखां पठान माजी अध्यक्ष, युनुसभाई शेख नगरसेवक न.प. सिंदेवाहि, जाहिदखां पठान, रियाज (बबलू) शेख, वसीम खान, सजावर खान, अष्पाक शेख, अताउल्लाह खान, नोमान कुरेशी, आसिफभाई कुरेशी माजी अध्यक्ष, युसुफभाई शेख माजि सचिव, इब्राहिम शेख माजी सचिव, रहीम खान पठान, रेहमान खान पठान, ख़लीलभाई शेख, कदीर पठान, अमानभाई कुरेशी, फजल शेख, सफीर पठान, वहाबआली सैय्यद, आदिल शेख, मोनीष शेख, बहुसंख्यने मुस्लिम समाजबांधव उपास्थित होते तसेच प्रामुख्याने, रामाकांतजी लोधे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी तथा जी.प. सदस्य, श्री अरुनभाऊ कोलते ज्येष्ठ कांग्रेस कार्यकर्ते, हरिभाऊ बारेकर सरचिटणीस ज़िला कांग्रेस कमेटी, वीरेंद्रजी जैसवाल माजी उप-सभापति प.स. सिंदेवाहि, मयूरभाई सूचक तालुका अध्यक्ष युवक कांग्रेस, नगरसेवक नरेन्द्रजी भैसारे, नगरसेवक भुपेशजी लाखे, नगरसेवक स्वपनिलजी कावळे, कुशाबराव मोरे, विनोदजी लोनकर, प्रविनभाऊ मोगरे, रौशनभाऊ वारजुरकर, सूरज बंसोड़, अरुनभाऊ गौरकार, मोरेश्वर द्यानवाडकर, अशोकजी सहारे, दर्शनजी निकोडे, मनोजभाऊ, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, संचालन, आभारप्रदर्शन राजुभाई (इब्राहिम) शेख उप-सरपंच ग्रा. प. लोनवाहि यानी केले आहे.