चिरोडी जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

0
692
Google search engine
Google search engine
ओळख पटल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असुन ओळख पटल्यास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर अनोळखी व्यक्ती पुरुष जातीचा वय अंदाजे ३५ ते ३८ वर्षे वयोगट, उंची अंदाजे पाच फुट दोन इंच, चेहरा लांबट असून काळ्या रंगाच्या केसाची दाढीमिशी आहे. रंग काळा, बांधा सडपातळ असून गळ्यामध्ये दोन माळ घातलेला, कमरेवर काळ्या रंगाचे शर्ट व अंगाखाली काळा व पांढऱ्या रंगाचे ब्लँकेट होते. १ जून रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान ग्राम चिरोडी जंगल वनखंड २९८  मध्ये एका भोशाच्या झाडाखाली सदर अनोळखी पुरुष जातीचे प्रेत चित्त अवस्थेत पडलेले होते. या अनोळखी इसमाच्या कुजलेल्या प्रेताचे शवविच्छेदन चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच केले व त्याचा जागेवरच अंत्यविधी करण्यात आला. सदर मृतक इसमाचे अद्याप पावेतो ओळख पटली नाही. तरीही वरील वर्णनाचे अनोळखी इसम हरविले असल्यास किंवा ओळख पटल्यास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन किंवा ०७२२२ – २५४०३६ येथे संपर्क करण्याचे आवाहन चांदूर रेल्वे पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.