वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकाच्या परिवाराला माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या कडून आर्थिक मदत

0
545
Google search engine
Google search engine

*गडबोरी येथे परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.*

*गावाच्या भोवती सोलर लाईट लावण्याच्या व भोवतालचा कचरा स्वछ करण्याच्या वन अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.*

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे काल 02 जून 2019 ला पहाटेच्या सुमारास स्वराज गुरनुले या ९ महिन्याच्या बाळाला वाघाने ठार केले, या घटनेने संपूर्ण गडबोरी गावात शोककळा पसरली आहे.

आज 03 जून 2019 ला ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांसह गडबोरी येथे जाऊन गुरनुले परिवाराची भेट घेत सांत्वन केले व आर्थिक मदत केली. व सरकार कडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वस्त केले. या वेळी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी गडबोरी गावातील लोकांशी संवाद साधला. या वेळी प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी वन अधिकाऱ्यांना गावाच्या भोवती सोलर लाईट लावण्याच्या व गावभोतील कचरा स्वच्छ करण्याच्या सूचना केल्या.

या वेळी माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी येथील ग्रामपंचायतीत नागरिकांशी संवाद साधला व या समस्या लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले व या संदर्भात राज्याचे वन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सोबतही चर्चा करणार असल्याचे सांगितले.

या वेळी भाजपा तालुका महामंत्री तथा जि.प सदस्य नागराज गेडाम, भा.ज.यु.मो तालुका अध्यक्ष तथा पं.स गटनेते रितेश अलमस्त, भाजपा अध्यक्ष भगवानजी पातेरे,सरपंच कमलाकर जवळे, पोलीस पाटील सुनील आगळे, राउंड ऑफिसर एस.वाय. बुटले, रणवीर दुपारे, सोशल मीडिया तालुका संयोजक हार्दिक सूचक, नमो ग्रुप फाऊंडेशन संयोजक रोशन सहारे, युवा मोर्चा अध्यक्ष चंदू सुरनकर, श्रीकांत कुचनवार, वन रक्षक एस.वाय. नागोसे यांच्या सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.