दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे शानदार उदघाटन !

0
1236
Google search engine
Google search engine

“उषाकिरण” यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय – पंकजाताई मुंडे

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधील तीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री घेणार

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या परळी बीड रोडवरील भव्य शैक्षणिक इमारतीचे उदघाटन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले . या प्रसंगी खा . प्रितमताई मुंडे , अमरावतीच्या खा . नवनीत राणा , आ . सुरेश धस , आ. रवि राणा , आ . संगिताताई ठोबरे , श्री . किरण गित्ते, IAS सचिव त्रिपुरा सरकार , विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते , जि . प . शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख , अंबाजोगाईचे मा . नगराध्यक्ष पापा मोदी , बेलंब्याच्या सरपंच इंदूमती गित्ते , दिनकर मुंडे गुरूजी , संजय दौड इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
CBSE पॅटर्नवर आधारित दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल Residential आणि डे बोर्डिंग स्कूल आहे . या शाळेचा लाभ तालुक्यातील सर्वसामन्य विद्यार्थ्यांना झाल्या पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले . यासाठी गरीब कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांनीच्या शिक्षणाच्या खर्च आम्ही तीन भगिणी उचलू असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले . ज्या मुलींना वार्षिक परिक्षेत 85 % गुण प्राप्त होतील त्यांची शिफारस शाळेने आमच्याकडे करावी असे त्या म्हणाल्या .
खासदार प्रितमताई म्हणाल्या उषा माझी बहीन आहे, शाळेतील वर्गमैत्रिण आहे. तिच्या शाळेत विद्यार्थ्यांनी 12 वी पर्येंत शिक्षण घेऊन नंतरचे उच्च शिक्षण माझ्या इंजिनिअरिंग व डेंटल कॉलेज मध्ये घ्यावे. मैत्रिण म्हणून उषाच्या शैक्षणिक कार्याचा मला अभिमान आहे .

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मधील प्रत्येक वस्तू उषाने स्वतः निवडलेली आहे . यासाठी त्यांनी चीनला जावून शाळेच्या फर्णीचरची. यावरून उषाची शाळेबद्दलची आत्मियता व आवड दिसते असे अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा कौर म्हणाल्या .
किरण गित्ते यांचे अमरावतीकरावर ऋण आहेत – आ . रवि राणा
आ . रविराणा यांनी किरण गित्ते यांच्या अमरावतीचे जिल्हाधिकारी असतानाच्या आठवणी जागविल्या. गित्ते साहेबांनी सर्व सामान्यांची कामे केली. जलयुक्त शिवारचे मोठ्या प्रमाणात कामे केली . विशेष म्हणजे अमरावतीचे एक एक आमदार म्हणजे एक बॉंब आहे. या सर्वांना सांभाळण्याची कला किरण गित्ते यांच्यात आहे .
आ . सुरेश धस म्हणाले गित्ते साहेबांना ही शाळा पुण्याला काढता आली असती पण ते मातीशी जुळलेले
अधिकारी आहेत. म्हणून त्यांनी शाळा आपले जन्मगावी काढली. दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मुळे upsc / mpsc परीक्षेत उत्तीर्ण होणारांची संख्या वाढेल असे आ. धस म्हणाले .

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल दिपस्तंभाचे काम करेल – किरण गित्ते
या प्रसंगी बोलताना किरण गित्ते म्हणाले की दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मराठवाड्यातील अग्रगण्य व आदर्श शाळा म्हणून पुढे येईल . या शाळेचे अनुपालन इतर शाळा करतील . यामुळे एकूणच शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे . माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती . त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली . म्हणून मी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची इमारत माझे वडील स्व . दिनकरराव गित्ते यांना अर्पण करतो

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा उषा किरण गित्ते यांनी शाळा पालकांची व विद्यार्थ्यांची दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा पूर्ण करेल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची नांदी ठरेल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रिंसिपल श्री . तेजेश कुमार यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण गित्ते इन्स्टिट्यूटचे संचालक प्रमोद पांडे यांनी केले .