Google search engine
Google search engine

प्रतिनिधी / येवदा –

दर्यापुर तालुक्यातील येवदा या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या जलवितरण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे चव्हाट्यावर आली आहे.या गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्याच जलवाहिन्या अद्याप कार्यरत आहेत.दोन शहरांसह १५६ गावांच्या सामायिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत येवदा या गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणे मार्फत गावातील जलकुंभाची उभारणी करण्यात आली होती. मात्र या जलकुंभातून पिण्याच्या पाण्याचे वितरण करणारी जलवाहिनी जुनीच असल्याने या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उभी झाली आहे.

येवदा या गावांमध्ये जुन्या जलवाहिनीमुळे समतोल पाणीपुरवठा करणे अत्यंत अवघड झाले आहे. सदोष वितरण व्यवस्थेमुळे गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन शहारांसह १५६ गावाची पाणीपुरवठा संपूर्णता नवीन असतांना सुद्धा येवदा गावाचा पाणीपुरवठा जुन्याच जलवाहिनीद्वारे कसा काय सुरू करण्यात आला हे अकालनिय आहे. याबाबत प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर यांनी महाराष्ट्र जलवीतरन विभागाला एका निवेदनाद्वारे ही बाब लक्षात आणून दिली आहे.तसेच येवदा येथील संपूर्ण गावातील जुन्या जलवाहिनी तात्काळ बदलण्याबाबत मागणी केली आहे. तसेच निवेदनात असेही नमूद केले की सध्यास्थितीत येवदा गावाची लोकसंख्या चौदा ते पंधरा हजारापर्यंत असून गावातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आणि विस्कळीत झाला आहे .पाणी आहे परंतु सदोष व जुन्या जलवाहिनी मुळे ग्रामवासीयांना पिण्याचे पाणी पूर्णता वितरण होऊ शकत नाही. जुन्या जलवाहिनी पूर्णतः निकामी झाल्याने त्या काढून नवीन मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकणे अत्यंत आवश्यक असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
करिता गावातील जलवाहिनीचे तात्काळ संवर्धन करून कामाचे अंदाजपत्रक मजिपाचे उप अभियंता दिनेश देशकर यांनी तयार करावे व कार्यवाही साठी प्रादेशिक विभाग कार्यालयात सादर करण्याची मागणी सुद्धा प्रदिप वडतकर यांनी केली आहे. या बाबतीत मजिपा कडून कार्यवाही न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने मजीप्रा च्या उपअभियंता कार्यालयात जलप्रक्षोप आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर सह उप जिल्हाप्रमुख शेतकरी संघटना महेश कुरळकर, दर्यापुर विधानसभा प्रमुख प्रदिप चौधरी ,बापूसाहेब साबळे ,डॉ दिनेश म्हाला, अनुराग मानकर,धनंजय रेंघे, विवेक इंगळे ,मंगळ रघुवंशी , अनिल काळे, मंगेश सावळे, उमेश बुरे , पप्पू पाटील गावंडे ,अर्जून रघुवंशी,अजय वडतकर ,शुभम भारती,अनिकेत सोनोने ,दिनेश वडतकर , विवेक इंगळे , राजुरकर कैसर ,नकुल शिरसाट ,मुकेश वडतकर , सुधीर कडू ,अनिकेत खेडकर , ऋषिकेश चौरे, रामेश्वर वडतकर ,दिपक खेडकर, व कार्यकर्ते यांनी दिला आहे.