पात्रीकर कॉलनीत भरदुपारी ८० हजारांची जबरी चोरी – चांदूर रेल्वे शहरात चोरीचे सत्र सुरूच

0
529
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे शहरात चोरीचे सत्र सुरूच असुन सोमवारी पात्रीकर कॉलनीत भरदुपारी ८० हजारांची जबरी चोरी समोरील दाराची कडी तोडून चोरांनी आत प्रवेश करून झाल्याची घटना घडली आहे.
चांदूर रेल्वे शहरातील पात्रीकर कॉलनी येथील विलास उत्तमराव ठाकरे हे सोमवारी बँकेत कामावर गेले होते व त्यांच्या पत्नी क्लासेस घेण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. घराला कुलुप लागल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुपारीच्या वेळी समोरील दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला. व कपाट उघडून १५ ग्रॅमची सोन्याची पोत अंदाजे किंमत ४६ हजार रूपये, सोन्याची अंगठी ३.५ ग्रॅमची अंदाजे किंमत दहा हजार रूपये, कानातले ३.५ ग्रॅमचे अंदाजे किंमत दहा हजार रूपये, नगदी ५ हजार ५०० रूपये तसेच देवघरातील चांदीच्या लक्ष्मी देवी ५ अंदाजे किंमत दहा हजार रूपये असा एकुण ८१ हजार पाचशे रूपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सायंकाळी कामावरून दोघेही घरी परतले असता सदर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यांनी ही माहिती तत्काळ चांदूर रेल्वे पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. चांदूर रेल्वे शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले असुन चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे.