सिंदेवाही तालुका वाघाच्या दहशती तुन भयमुक्त करावा -राष्ट्रवादीचे अभिजीत मुप्पिंडवार यांची मागणी

0
487
Google search engine
Google search engine
सिंदेवाही -सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव उपवनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गडबोरी गाव परिसरात बिबट्याने मागील दोन महीण्यापासून धुमाकुळ घातलेला आहे. गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक सतत दहशतीत असतात. मात्र कालची
 (रविवार) पहाटे ०३.३० वा. सुमारास गडबोरी येथे बिबट्याने ०९ महिन्याच्या (राकेश) स्वराज सतीश गुरुनुले या निरागस चिमुरड्या आई सोबत झोपलेला असतांना. घराच्या झपरातून उचलून नेऊन त्याच्या नरडीचा घोट घेतला. आणि संपूर्ण गावावर रविवार ची पहाट ही काळ पहाट ठरली.
 या परिसरात वाघ-बिबटयाच्या दहशतीमुळे गाव भयभित झाले असून अशा वन्य हिस्त्र प्राण्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्याची मागणी त्यांनी  केली आहे.
सिंदेवाही तालुका वाघांच्या दहशतीतून भय मुक्त करावा. शेतीचे काम सध्या चालू असल्यामुळे शेतकरी हा शेतावरच असतो. त्यामुळे परिसरात
वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी. अभिजीत मुप्पिडवार राष्ट्रवादी काँग्रेस  जिल्हाध्यक्ष (प्र.वि.)
असे त्यांनी सांगितले.