शेगांव नगरीत ईद उत्साहात

0
445

शेगाव :- मागील एक महिन्यापासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होता, या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे ठेवत असून, काल रोजी रात्री चंद्र दिसल्यानंतर आज संपूर्ण भारतात ईद हा सण मुस्लिम बांधव उत्साहाने साजरा करतात, दिवसाची सुरुवात सकाळची नमाज वाचून केली जाते, त्यानंतर कब्रस्तान मध्ये जाऊन नमाज केली जाते ,ईदच्या उपलक्ष मध्ये शेगाव येथील इदगा मज्जित मध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी आज मझ्झीत मधे नमाज वाचली, ईद मुळे संपूर्ण शहरातील बाजारात उत्साह पाहायला मिळाला , तर काही विविध चौकांमध्ये मज्जितांवर रोशनाई दिसून आली नगर परिषद मध्ये नगरसेवक शेख नईम शेख जमाल यांच्याकडून सर्व बांधवांना शीरखुर्मा चे वाटप सुद्धा करण्यात येते यावेळी लहान लहान मुले नवीन नवीन कपड्यांमध्ये सजून-धजून फिरतांना दिसत होते
तर संपूर्ण भारतात भाईचारा व अमन कायम रहावा या करीता ही सकाळची नमाज असते अस ईदगाह मज्जीत चे ईमाम यांनी आमच्या प्रतिनिधि सोबत बोलतांना सांगीतले.