जागतिक मासिक पाळी दिवस उत्साहात साजरा …#bleedthesilence

0
1483
Google search engine
Google search engine

चंद्रपूर -निसर्गनियमनाप्रमाणे तरूणी ना मासिक धर्माला सामोरे जावेच लागते ..तारुण्याचे उंबरठ्यावर मासिक धर्म होणे निरोगीपणाचे लक्षण असून खऱ्या अर्थाने सज्ञानता येण्याचे ते सुचिन्ह आहे त्यामुळे मासिक स्त्राव त्याज्य किंवा कोणतीही घाणेरडी बाब नसून महिलांनी पालकांनी मासिकधर्माकडे सकारात्मक व निकोप दृष्टीकोन ठेवून बघण्याची गरज वाशिम च्या युवा महिला कार्यकर्त्या सौ स्नेहल चौधरी कदम (संस्थापक-क्षितीज संस्था)ह्यांनी चंद्रपुरातील संकल्प संस्थेच्या सभागृहात युवतींना प्रबोधन करताना प्रतिपादन केले
ह्याप्रसंगी उपस्थित महिलांना नॅपकिन चे निशुल्क वितरण करण्यात आले
संपूर्ण महाराष्ट्रभर #bleedthesilence मोहिम चालवुन आरोग्यविषयक प्रबोधन केल्याबद्दल स्नेहल चौधरी कदम ह्याना व समाजपयोगी योगदानाबद्दल सीमादेवी ठाकूर ह्यांना” कार्यगौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला  इंदिरानगर परिसरातील महिलांची उस्फुर्त उपस्थिती लाभली होती  कार्यक्रमाला श्रीराम पान्हेंरकर, अविनाश निम्बालकर, प्रसाद पान्हेंरकर, पूजा कुल, अड. सुचिता,विकलांग संस्था चंद्रपुर, वरोरा वासी,अलका पचारे अश्लेषा जीवतोडे भोयर रखा सोयाम वैशाली खाडिलकर अंकिता देशट्टीवार स्वाती देवाळकर ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती