कॅप्टन सुनील डोबाळे हे विदर्भ भूषण – सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज सेवापुर्ती निमित्त कॅप्टन डोबाळेंचा भव्य नागरी सत्कार

0
634

 

अकोट/ ता.प्रतिनिधी तालुक्यातील ताजनापुर चे भूमिपुत्र कॅप्टन सुनील डोबाळे हे विदर्भभूषण आहेत. ताजनापुरच्या मातीतल्या या सुपुत्राने सैन्य सेवेची गौरवपूर्ण पताका 29 पेक्षा जास्त देशात फडकावली मात्र जगभरातल्या भ्रमंतीनंतर आजही त्यांचे पाय ताजनापुर च्या मातीला विसरले नाहीत. असा भारतपुत्र तालुक्यासह विदर्भासाठी गौरवास्पद आहे असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय प्रबोधनकार संदीप पाल महाराज यांनी केले ते सैन्य सेवेतून निवृत्त झालेल्या कॅप्टन सुनील डोबाळे यांच्या नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते.

भुमी फाउंडेशन, ताजनापुर ग्रामवासी तथा विविध संस्था संघटनांच्या वतीने या भव्य नागरी सत्काराचे ताजनापुर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर बाळापूरचे वरिष्ठ ठाणेदार गजानन शेळके, सरपंच सौ प्रतिभा रविंद्र मेंढे,कॅप्टन सुनील डोबाळे, सौ वंदना सुनील डोबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ताजनापूर ग्राम वासियांतर्फे प्रकाश डोबाळे यांनी कॅप्टन सुनील डोबाळे व सौ वंदना डोबाळे यांचा सपत्नीक नागरी सत्कार केला. यावेळी सत्काराला तालुक्यातील विविध संस्था संघटनासह भुमी फाऊंडेशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन , माजी सैनिक संघटना,अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिति,नयन संस्था, मायबोली प्रतिष्ठान यांच्यावतीने कॅप्टन सुनील डोबाळे यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.या नागारी सत्कार सोहळ्या निमित्त कॅप्टन डोबाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांचा जिवनप्रवास उलगडला.या नागरी सत्कार सोहळ्या निमित्त प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम रात्री पार पडला. किर्तनाला पंचक्रोशीतील चंडिकापूर वाई , रंभापुर, वडगाव मेंढे, देऊळगाव आदी गावातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन भुमि फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ यांनी केले तर आभार वसंत डोबाळे यांनी मानले.