टाकळी (बेंबळी) तेरणा नदीसह ओढाखोलीकरणाचे काम प्रगतीपथावर

104

टाकळी (बेंबळी) येथे तेरणा नदीसह ओढाखोलीकरणाचे काम प्रगतीपथावर

उस्मानाबाद /प्रतिनिधी –

उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) येथील तेरणा नदीसह तेरणा नदीस मिळणाऱ्या ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम भारतीय जैन संघटना आणि शासनाच्या माध्यमातून होत असून हे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यास टाकळी(बें) आणि धुत्ता गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार असून, पाणी पातळी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

या पूर्वी ही तेरणा नदीचे आणि सवळा काम अर्धवट अवस्थेत राहिले होते, यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनटक्के यांनी सतत संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करून, येथील तेरणा नदीचे दोन टप्प्यात तर सवळा नदीचे एक टप्प्यात असे एकूण २३५० मीटर लांबी, रुंदी ३० मीटर आणि खोली दोन मीटर करण्यात येत आहे, तर तेरणा नदीस मिळणाऱ्या ओढ्याचे ही खोलीकरण दिड किलोमीटर होणार आहे.
येथील तेरणा नदीच्या पहिल्या टप्प्याच्या खोलीकरणास (दि२९मे) रोजी तर ओढा खोलीकरणास (दि३जून) तर तेरणा नदीच्या दुसऱ्या टप्प्यास आज (दि५) बुधवारी सुरुवात करण्यात आली.
यावेळी तेरणा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या उदघाटन प्रसंगी माजी सरपंच काकासाहेब पाटील , सोसायटी चेअरमन तानाजी गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तात्रय सोनटक्के, प्रा.राजा जगताप , रमेश सूर्यवंशी,ग्रामपंचायत सदस्य नागोराव सोनटक्के, प्रताप गायकवाड,वर्धमान शिरगिरे, उपसरपंच पिरसाब शेख, ग्रामसेवक डी. पी. गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाउपाध्यक्ष किरण महानुरे, नंदकिशोर हजारे, बळीराम खटके,महादेव सूर्यवंशी, राजू शेख, महादेव सोनटक्के, पाशुमिया शेख, रहेमतूला शेख, आदम शेख तौफिक शेख , महादेव जाधव , शरद सोनटक्के यांच्या सह शेतकरी बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.

ऍड.व्यंकट गुंड यांची कामास भेट

या परिसरातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ऍड. व्यंकट गुंड यांनी आज(दि५) येथील तेरणा नदीवर भारतीय जैन संघटना आणि शासनाकडून होत असलेल्या खोलीकरणा स आनि रुंदीकरणास भेट दिली आणी होत असलेल्या कामाचे कौतुक करून होत असलेल्या कामाबाबत शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिले.यावेळी त्यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुधाकर गुंड, जिल्हा परिषद गटनेते ज्ञानदेव राजगुरू, बाबुराव पुजारी यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।