शेगावची स्वारी निघाली पंढरीच्या दारी

0
911
Google search engine
Google search engine

शेगांव:- दिनांक 8 जून रोजी विदर्भाची पंढरी म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगभर आहे असे संत श्रेष्ठ गजानन महाराज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनाकरिता आपल्या राजेशाही थाटात अश्व हत्ती टाळ मृदंग आणि वारकरी व भक्तांच्या समवेत शेगाव येथून पंढरपूरला प्रस्थान झाले,
०८ जून ला सकाळी सात वाजता महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूर करता निघाली, पहिला पडाव ०६ किलोमीटर अंतरावर असलेले गुरु भाऊ गोमाजी महाराज नागझरी संस्थान येथे राहील ,गोमाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर महाराजांची पालखी पारस, भैरद मार्गे अकोला कडे निघेल, अकोला येथे महाराजांची पालखी दोन दिवस थांबते
या पालखीमध्ये सातशे वारकरी असून चालते फिरते रुग्णालय, जागोजागी वारकऱ्यांच्या थांबवण्याकरता जी व्यवस्था लागते ते साहीत्य पाण्याचे टॅंकर व आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू पालखीसोबत असतात हा संपूर्ण प्रवास १२०० किलोमीटरचा असून सहाशे पन्नास किलोमीटर जाणे आणि पाचशे पन्नास किलोमीटर परत येणे असा असून दिनांक दहा जुलै रोजी महाराजांची पालखी आळंदी येथे पोहोचेल 12 तारखेला आशाढी एकादशी (देवयानी एकादशी ) ला विठ्ठल माऊलीचे दर्शन करून सोळा तारखेला परतीच्या मार्गाला राहील, पहिला पडाव करकंब येथे असून दिनांक 29 जुलै ला बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे सिंदखेड राजा येथे पालखीचे आगमन होईल तर दिनांक 5 /8/19 रोजी नागपंचमिला खामगाव, रजत नगरीत पालखीचे आगमन होते येथे पालखीचे दिव्य भव्य स्वागत होते दिनांक 6 /8 /19रोजी शेगावला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचं आगमन होते असा हा एकून 1200 किलोमीटरचा प्रवास वारकरी नाचत गाजत पूर्ण करतात.