दहावीचा राज्याचा निकाल 77.10 टक्के – अमरावती विभागाचा निकाल – 71.98 टक्के

0
2379
Google search engine
Google search engine

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.21 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. गेल्या पाच वर्षांमधील यंदा दहावीचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस कॉन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दहावीचा विभागनिहाय निकाल

पुणे – 82.48 टक्के

मुंबई – 77.04 टक्के

नागपूर – 67.27 टक्के

अमरावती – 71.98 टक्के

लातूर – 72.87 टक्के

नाशिक – 77.58 टक्के

औरंगाबाद – 75.20 टक्के

कोल्हापूर – 86.58 टक्के

कोकण – 88.38 टक्के