बाळापुरचे ठाणेदार गजानन शेळकेंनी तयार केली अभिनव पोलीस पाटील मार्गदर्शिका

0
1331

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते 11जून ला होणार वितरण

आकोला(प्रतिनीधी)- पोलीस आणि ग्रामीण जनता ह्या मधील महत्वाचा दुवा म्हणून ग्राम पातळीवर सेवा देणाऱ्या पोलीस पाटील यांच्या माहीतीसाठी बाळापुरचे ठाणेदार गजानन शेळकेंनी अभिनव पोलीस पाटील मार्गदर्शिका तयार केली आहे या पुस्तीकेचे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते 11जून ला होणार वितरण होणार आहे.

पोलीस पाटील हे ग्रामिण भागात.कार्यरत असतात, ग्रामीण पोलीस व्यवस्थें मध्ये पोलीस पाटील महत्वाची भूमिका निभावत असतात,महाराष्ट्रात पोलीस व्यवस्था सुरू झाल्या पासून ग्रामीण पातळीवर पोलीस पाटील व्यवस्था सुरू आहे, पोलीस पाटील पद हे त्या गावातील एक मानाचे पद समजल्या जाते, म्हणून त्यांना पगारी सेवक न ठेवता त्यांना मानधनाच्या तत्वावर कार्यरत केल्या जाते, ग्रामीण पातळी वरील पोलीस पाटलांना काही अधिकार व कर्त्यव्य प्रदान केलेले असतात ,परंतु बऱ्याच पोलीस पाटलांना त्यांना काय अधिकार आहेत व त्या अनुषणगाने त्यांनी कोणते कर्त्यव्य पार पाडणे आवश्यक आहे ह्या बाबत बऱ्याच पोलीस पाटलांना कल्पना नसते कारण पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झाल्या नंतर त्यांना प्रशिक्षण देण्याची काहीही व्य वस्था नाही, त्या मुळे दैनंदिन कर्त्यव्य पार पाडत असतांना पोलीस पाटलांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, पोलीस पाटलांची ही अडचण लक्षात घेऊन बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलीस पाटील साठी एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक 11 जून रोजी रिधोरा येथे केले असून त्या दिवशी पोलीस अधीक्षक एम राकेश कला सागर ह्यांचे हस्ते पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे वितरण बाळापूर पोलीस स्टेशन हद्दी मधील पोलीस पाटलांना करण्यात येणार असून सदर कार्यक्रमात अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी रमेश पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी राज्य पोलीस पाटील संघटनेचे निमंत्रक रिधोरयाचे पोलीस पाटील सुजय देशमुखउपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी तयार केलेल्या ह्या पोलीस पाटील मार्गदर्शिके मध्ये पोलीस पाटलांना माहीत असणे आवश्यक असे कायदे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम मधील तरतुदी, प्रथोमोचार, पोलीस पाटील समभधाने महाराष्ट्र शासनाचे मागील 20 वर्षाचे परिपत्रक, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्त्यव्य इत्यादी बाबत माहिती दिली आहे, सदर मार्गदर्शिकेचे पोलीस पाटलांना त्यांच्या कामात निश्चितच मदत होईल असा विश्वास पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी व्यक्त केला आहे.