पञकार श्री कमलकिशोर भगत यांना मातृशोक

131

आकोट/ ता.प्रतिनीधी:-

आकोट तालुका पञकार संघाचे कार्याध्यक्ष पञकार कमलकिशोर भगत यांची आई ग.भा.ताराबाई तुळशीराम भगत (७५) यांचे ९ जुन रोजी पहाटे ह्रदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. त्या धार्मिक वृत्ती,मनमिळावु स्वभावाच्या व कुटुंब वत्सल होत्या.त्यांच्या मागे शामसुंदर, पञकार कमलकिशोर व राजकुमार अशी तीन मुलं, सुना,नातवंड व बराच मोठा आप्त परीवार आहे. त्याचेवर अंजनगाव मार्गावरील स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. अंत्ययाञेत नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राजकीय,सामाजिक तथा विविध संघटना तर्फे तसेच नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. श्रध्दांजली सभेचे संचलन तालुका पञकार संघाचे सचिव पञकार तथा नगरसेवक मंगेश लोणकर यांनी केले. राजु चोंडेकर यांनी शांतीपाठाचे पठन करुन सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।