प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुझफ्फरपूर (बिहार) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

95

मुझफ्फरपूर (बिहार) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ  अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी मुझफ्फरपूर येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, अधिवक्ता पुनाळेकर यांनी न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा अधिवक्त्यांना अटक करणे, हे एक षड्यंत्र असून हिंदूंची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे.

अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे हे निर्दोष आहेत. त्यांची तातडीने सन्मानपूर्वक मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।