महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात युवा स्वाभिमान पार्टीचा यल्गार- कार्यकारी अभियंत्याला कंदील भेट

236

अमरावती :-
०शहरात झालेल्या वादळ वाऱ्याने महावितरणचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिक त्रस्त झाले आहेत या विरोधात आज युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंताना धारेवर धरून या अनागोंदी बाबत जाब विचारण्यात आला यावेळी कार्यकारी अभियंत्याना युवा स्वाभिमान हॉकर्स युनियनचे शहर अध्यक्ष गणेश मारोडकर, रविंद्र अडोकार, सुरज चढार, अक्षय देशमुख सह कार्यकर्त्यांनी कंदील भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला