एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे एस. टी. आगारात हजारो लिटर पाणी वाया – एस. टी. बस आगार प्रशासनाचे दुर्लक्ष

95
चांदूर रेल्वे – Shahejad Khan-
एकीकडे चांदूर रेल्वे शहरात दुष्काळस्थिती असतांना दुसरीकडे लिकेज पाईप लाईनमधुन हजारो लिटर पाणी वाया गेले असुन एस. टी. बस आगार प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
चांदूर रेल्वे शहरात भिषण पाणीटंचाई असुन पाण्यासाठी हाहाकार होत आहे. नगर परिषदेकडून टँकरने पाणीपुरवठा करून कसाबसा नागरीकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे भयानक चित्र असतांना एस.टी. आगारात पाण्याचा अपव्यय होतांना दिसत आहे. मंगळवारी शहरात आलेल्या वादळी वाऱ्यात एस.टी. आगाराची एक भिंत कोसळली. या कोसळलेल्या भिंतीमुळे वसतीगृहाकडील आगाराच्या मागील बाजुची २४ तास सुरू असलेली पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली. यामुळे मंगळवार पासुन सतत शनिवार पर्यंत २४ तास हजारो लिटर पाणी वाया गेले.
मात्र ४ दिवसापासुन याकडे आगार प्रशासनाने दुर्लक्ष केले. या लिकेज पाईपलाईनमधुन त्या परिसरातील नागरीक पाणी भरण्यासाठी गेले असता आगारातील सेक्युरीटी गार्डने त्यांना हटकल्याचे काहींनी सांगितले. मात्र त्यांना तो लिकेज दुरूस्त करण्यासाठी कोणाला सांगण्याचे समजले नाही. ही बाब युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संदिप शेंडे यांना माहित पडताच त्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. व याबाबत नगर परिषदला शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान कळविले. त्यानंतर नगर परिषदचे पाणी पुरवठा अभियंता, कर्मचारी जितेंद्र कर्से हे तेथे आले व रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांनी थेट व्हॉल्व बंद करून पाणी पुरवठा थांबविला. लिकेज दुरूस्त झाल्यानंतर पाणी पुरवठा पुर्वरत सुरू होणार असल्याचे समजते. २४ तास पाणीपुरवठा सुरू असल्यामुळे आगारातील एकाही कर्मचाऱ्याला याची जाण जाणवली नसुन आता अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कोण कारवाई करणार हे समजण्यापलीकडे आहे.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।