घुईखेडच्या नुकसानग्रस्त घरांची प्रविण घुईखेडकर यांनी केली पाहणी – सचिव व तलाठी यांना बोलावुन स्वत: समक्ष सुरू केले पंचनामे

115
वादळी वाऱ्यात ७५ घराचे नुकसान, सरपंच विनय गोटफोडे यांचीही उपस्थिती
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथे शनिवारी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले होते. रविवारी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी या घरांची पाहणी करून सचिव व तलाठी यांना बोलावुन स्वत: समक्ष पंचनाम्याला सुरूवात केली.
शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील घुईखेड येथे वादळी वाऱ्यासह पाऊस आला. यामध्ये घुईखेड मधील जवळपास ७५ घरांचे टिनाचे छप्पर उडुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी माजी जि. प. सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविण घुईखेडकर यांनी नुकसानग्रस्त गावातील घरांची पाहणी केली. यानंतर सचिव सुरेंद्र शाह, तलाठी बोके, कोतवाल सचिन बनकर यांना बोलावुन पंचनाम्याला सुरूवात करवुन घेतली. रविवारी दिवसभरात ४० घरांचे पंचनामे झाल्याचे समजते व उर्वरीत घरांचे पंचनामे आज होणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समजते. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी प्रविण घुईखेडकर प्रशासनाकडे करणार असल्याचे सांगीतले. यावेळी सरपंच विनय गोटेफोडे यांचीही उपस्थिती होती.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।