३ कोटी १७ लाख निधी विकास कामाच्या भुमिपुजन उद्घाटन. भाजपामुळेच विकास कामांना गती: आमदार पृथ्वीराज देशमुख

सांगली/कडेगांव न्युज :_ सत्तेमध्ये नसतानाही कार्यकर्त्यांनी अखंड व प्रामाणिक साथ दिली त्यामुळे राजकारणात व समाजकारणामध्ये सतत कार्यरत राहिलो. आता भाजपाने मला संधी दिली व पंचायत समिती, जिल्हा परिषद ते राज्य व केंद्रा सरकार पर्यत आपल्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे प्रतिपादन आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.उपाळे मायणी ता. कडेगांव येथे विधान परिषदेवर आमदार पृथ्वीराज देशमुख याची बिनविरोध निवड झाले बद्दल नागरी सत्कार व विविध विकास कामाचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, पंचायत समिती सभापती मंदाताई करांडे, उपसभापती रविंद्र कांबळे प. स. सदस्य प्रा. आशिष घार्गे, मंगल क्षिरसागर हे प्रमुख उपस्थितीत होते.यावेळी उपाळे मायणी ता. कडेगाव येथे 3 कोटी 17 लाख रक्कमेचा उदघाटन व भूमिपूजन समारंभ आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यामध्ये हिंगणगांव बु. ,उपाळे वांगी. उपाळे मायणी, तोंडोली ,अमरापूर रस्ता २.६१ कोटी, उपाळे मायणी ते खेराडे वांगी ग्रा. मा ९५ रस्ता सुधारणा करणे १५ लाख, उपाळे मायणी येथील अर्तगत रस्ते सुधारणा करणे २५/१५ मधून १० लाख, उपाळे मायणी येथील रोहिदास नगर, साठेनगर व आंबेडकरनगर येथील आर. सी. सी. गटर व पेव्हींग ब्लाँक बसविणे ११.७६ लाख, उपाळे मायणी येथील ‘ क ‘ वर्ग तिर्थक्षेत्र मारुती मंदीर पेव्हींग ब्लाँक बसविणे ५ लाख, उपाळे मायणी येथील जि. प. शाळा दुरुस्ती करणे ३ लाख, उपाळे मायणी येथील अंगणवाडी क्र. १२७ इमारत दुरुस्ती करणे ३ लाख, उपाळे मायणी येथील जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा बांधणे ९.८० लाख. या कामाचा समावेश आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आले नंतर कडेगांव तालुक्याच्या विकासासाठी १०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला व विकासकामांचा वेग वाढला आहे. आपला मतदार संघातील काही गावे विकासापासून वंचित होती परंतू सद्या सर्व गावात विकास कामे सुरु आहेत. आम्ही ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची आहे हे न पाहता विकास निधी देत आहे. या मतदार संघातील एकही गांव विकासापासून वंचितराहणार नाही..स्वागत व प्रास्ताविक उदय पाटील यांनी केले. यावेळी जेष्टनेते चंदर दादा घार्गे, शंकर घार्गे अशोक पाटील, उदय पाटील, विजय घार्गे, सिद्धनाथ (आप्पा) घार्गे, रुपेश कदम, आप्पासो घार्गे, काकासाहेब घार्गे, दत्ता घार्गे, कुमार काटरे सोमनाथ घार्गे, अमोल कदम, हिंदूराव माने, हणमंतराव कदम, बंडा काटकर, बापू माने व इतर मान्यवर आणि उपाळे मायणी गावचे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।