वाशी तालुक्यातील सारोळा मांडव्याच्या ग्रामस्थांचे लाईटसाठी उपोषण

110

वाशी तालुक्यातील सारोळा मांडव्याच्या ग्रामस्थांचे लाईटसाठी उपोषण

उस्मानाबाद / प्रतिनिधी –

वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा या गावातील ग्रामस्थांना एक वर्षापासुन सिंगल फेस लाईट मिळत नसल्यामुळे वैतागून ग्रामस्थांनी वाशी येथील विद्युत महावितरणच्या उप विभागीय कार्यालयात उपोषण सुरु केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात सारोळा मांडवा हे गाव आहे .गावापासून दोन किलोमिटर वस्ती आहे त्या वस्तीवर गेल्या दहा वार्षापासून लाईट नाही .या वस्तीतील घरावर काही दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दगडफेकही केली होती.एक दोन म्हशीही चोरी गेल्या आहेत वस्तीवर जवळपास दहा ते बारा घरे आहेत.त्या घरांना लाईट मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी एक वर्षापूर्वीपासून पाठपूरावा सुरु केला होता.परंतू अद्यापही ग्रामस्थांना लाईट न मिळाल्यामूळे ग्रामस्थांनी हे उपोषण सुरु केलय.या महाविणच्या गलथान कारभार व अधिकार्यांचा कामचुकारपणाला वैतागुन ग्रामस्थांनी उपोषणाचा निर्णय घेतलाय. उपोषण सुरु केल्यापासून महावितरणचे एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकले नसल्याची माहीती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामस्थांनी दिलीय.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।