शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात- अमरावती येथे घंटानाद आंदोलन

432
जाहिरात

अमरावती :-

सततच्या नापिकी, दुष्काळाच्या भिषण दाहकतेमुळे आणि शासकीय यंञणेच्या उदासीनतेमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आजघडीला शेतकर्‍यांमधे अत्यंत भयावह परिस्थिती आहे, शेतकर्‍यांकडे पेरणीला पैशेच नाहीत गत वर्षी चा शेतकर्‍यांनी विविध पिकांवर काढलेला विमाच शेतकर्‍यांना मिळाला नाही त्यामुळे शासनाने जाचक अटी रद्द करून जिल्ह्यात सरसकट पिक विमा मंजूर करावा
व शासनाने तेलंगणाच्या सरकारच्या धर्तीवर पेरणीसाठी शेतकर्‍यांना एकरी दहा हजार रुपये द्यावे असे निवेदन मुख्यमंञ्यांना अमरावती जिल्हाधिकार्यांमार्फत दिनांक मागे देण्यात आले होते.त्या निवेदनाची शासनाने दखल घेतलेली दिसत नसल्यामुळे प्राथमिक स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले व येत्या काही दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनही देण्यात आले.
आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली अशी एकच चर्चा दिसुन आली.
नागरिक व जनावरांसाठी पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे, शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकर्‍यांच्या शेतीपंपाचे विद्युत बीले माफ करावीत, शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करावे, शेतकर्‍यांना २०१९-२०२०या हंगामासाठी बिनव्याजी २ लक्ष रुपये कर्ज द्यावे, पेरणीसाठी शेतकर्‍यांना एकरी दहा हजार रुपये द्यावे, रासायनिक खतांचा भाववाढ मागे घ्यावी, शेतकरीही विरोध कायदे मागे घ्यावेत ,शेतीमालाला हमीभाव द्यावा,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास २ हजार कोटी निधी वर्ग करण्यात यावा.अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिनांक २७ मे २०१९रोजी पाठविण्यात आले होते.त्या निवेदनाची शासनाने योग्य दखल न घेतल्यामुळे झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड च्या वतीने एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात आले व येत्या काही दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले .

यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेशउपाध्यक्ष डॉ. अभय गावंडे,जिल्हाध्यक्ष रणजित तिडके अरविंद घाटे,संजय ठाकरे,अंकुश साठे,शरद काळे,कुशल देशमुख,हर्षदीप चावके,शुभम शेरकर,दीपक लोखंडे,अजित काळबांडे,गजानन मानकर,दीपक ठाकरे,मनोज सोळंके,नमित हुतके,सुयोग वाघमारे,संदीप गावंडे,पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।