तोरंबा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

463

तोरंबा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्याउस्मानाबाद /प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तोरंबा येथील अल्पभुधारक शेतकरी विठोबा ऊर्फ आण्णासाहेब भानुदास मोहिते वय ५० वर्षे या शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व कर्जबाजारी पणाला कंटाळुन स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन विठोबा ऊर्फ आण्णासाहेब मोहिते हे रविवारी संध्याकाळी आपल्या शेतात गेले होते.रात्रीच्या सुमारास त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असावा अशी शक्यता बोलुन दाखवली. घरच्यांनी इतरत्र नातेवाईकांकडे शोधाशोध केली.व मयताचा चुलतभाऊ गोवर्धन हा काल ५ च्या दरम्यान शेतात गेला असता प्रेत झाडाला लटकलेल्या दिसले.काल संध्याकाळी ऊशिराने गोवर्धन मोहिते यांनी दिलेल्या खबरीवरुन बेंबळी पोलिसांत आकस्मात मृत्युची नोंद झाली.आज सकाळी शवविच्छेदन करुन त्यांच्यावर तोरंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी व एक मुलगा व तीन विवाहित मुली असा परिवार आहे.तर या घटनेचा पुढील तपास हेकॉ.अनिल जोशी हे करत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।