मुरमाडी येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तुळशीराम पेंदाम यांच्या परिवाराला वन विभागाकडून आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द

175
खा.अशोकभाऊ नेते व माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चेक सुपूर्द.
सिंदेवाही- तालुक्यातील मुरमाडी येथे ९ जून ला तुळशीराम पेंदाम वाघाच्या हल्ल्यात ठार झाले. आज गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री.अशोकभाऊ नेते यांच्या हस्ते वन विभागाकडून २,७०,००० रुपयांचा चेक पेंदाम परिवाराला सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी प्रा.अतुलभाऊ देशकर, उपवनसंरक्षक कुलराज सिंग साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी खा. अशोकभाऊ नेते यांनी वन अधिकाऱ्यांना वाघाला पकडण्याच्या सूचना दिल्या. व प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी अधिकाऱ्यांना खडसावत गावभोतील कचरा स्वछ करण्यास व सोलर लाईट लावण्यास सांगितले.
या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते प्रा.गोपीचंद गणवीर, पं. स सभापती मधुकरराव मडावी, पं.स सदस्य रणवीर दुपारे, भाजपा सिंदेवाही शहर अध्यक्ष किशोर भरडकर,नामदेव लोखेंडे, सरपंच रुपाली रत्नवार, सोशल मीडिया संयोजक हार्दिक सूचक, ACF राजेश्वरी भोंगाळे, RFO गोंड,दिलीप जाधव, पियुष प्यारामवार,मयूर बनसोड यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.