समाज कल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भरावा लागतोय आर्थिक भुरदंड

0
704
Google search engine
Google search engine
समाज कल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भरावा लागतोय आर्थिक भुरदंड
उस्मानाबाद ,
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, शाखा उस्मानाबाद च्या वतीने माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग शासकीय मध्यवर्ती इमारत उस्मानाबाद व जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना मासिक वेतन दरमहा एक तारखेला होण्यासाठी निवेदन माननीय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग शासकीय मध्यवर्ती इमारत उस्मानाबाद वरील विषयास संदर्भाने विनंती पत्र देण्यात येते की आपल्या अधिनस्त अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन-दोन महिने वेतन अदा करण्यात येत नाही याबाबत यापूर्वी नाईलाजाने माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते तेव्हाच वेतन अदा करण्यात आले नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे शासन पद्धती चालू राहिले आहे याबाबत आपल्या लातूर विभाग संचालनालय पुणे व माननीय सचिव वीज मंत्रालय मुंबई यांचे कार्यालयात ही चर्चा करून निवेदने देण्यात आले आहेत महोदय कर्मचाऱ्यांनी वीस – पंचवीस लाख रुपये बँकेकडून गृह कर्ज घेतले आहे. त्याला मुख्याध्यापक महोदयांची शिफारस हि आहे. सदर कर्जाच्या हप्त्याची परतफेड नियमित न झाल्यास बँक कर्जदाराकडून दंड व्याज वसूल करते हे अन्यायकारक आहे. याबाबत मुख्याध्यापक व आपल्या कार्यालयात चौकशी केली असता मुख्याध्यापक हेच वेळेवर देयके सादर करीत नाहीत असे समाज कल्याण कार्यालयाकडून सांगण्यात येते तर आम्ही देयके वेळेवर दाखल करतो पण समाजकल्याण खात्याकडून द्यायचे उशिरापर्यंत केले जातात अशी उडवा आहे . तरी याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दरमहा एक तारखेला होईल अशा पद्धतीने संबंधित मुख्याध्यापक व कार्यालयीन आस्थापने निर्देशित निर्देश देण्यात यावे ही विनंती करण्यात आली . यावरती जिल्हाध्यक्ष बापू शिंदे व महासचिव चंद्रकांत माळाळे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत .