तालुक्यातील जुना जामसाळा ग्रामपंचायतीचा गाव स्वच्छतेकडे दुर्लक्ष…नागरिकांनी केला आरोप

0
496
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- गेल्या अनेक दिवसांपासून जुना जामसाळा  ग्रामपंचायतीकडून गाव  स्वच्छता होत नसल्याचा आरोप ग्राम वासियांकडून केला जात आहे व त्याबाबत मागील महिन्यात लेखी तक्रार श्री हरिदास बालाजी नैताम यांनी ग्रामपंचायतला केली होती तसेच याची माहिती संवर्ग विकास अधिकारी सिदेवाही यांना सुद्धा देण्यात आली परंतु आजतागायत गाव स्वच्छतेचा विषय संपलेला नसून ग्रामपंचायतीकडुन सतत याकडे दुर्लक्ष केला जात आहे. गावातील नागरिकांचा आरोप असा आहे की मा. ग्रामसेविका मॅडम हे ग्रामपंचायत कार्यालयात दररोज उपस्थित नसल्यामुळे गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे व याचा फटका गावातील नागरिकांना बसत आहे.

माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छतेवर जास्ती लक्ष दिलेले आहे परंतु काही अधिकारी यांच्या दुर्लक्ष कारभारामुळे  स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तरी पावसाळा लागायच्या अगोदर पुर्ण गाव स्वच्छ करण्यात यावा जेणेकडुन कोणत्याही रोगराईस गावातला नागरीक बळी जानार नाही अशी मांगनी स्थानीक लोकांकडून होत आहे.

मा. कन्नाके मैडम ग्राम सेविका ग्रामपंचायत जुना जमसाळा यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केले असता चारही वेळा प्रतिनिधीचे फोन उचलले नाही यावरून किती कर्तव्यदक्ष ग्रामसेविका आहे असे दिसते?

 

संवर्ग विकास अधिकारी सिदेवाही यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केले असता त्यांनी मी रजेवर असल्याकारनाने माहिती देऊ शकत नाही सिंधे साहेबाशी संपर्क करा असे मटले.