वाघाचा बंदोबस्तकरीता मुख्यमंत्र्यांना दिले शिवसेनेचे मिथुन मेश्राम यांनी निवेदन

0
904
Google search engine
Google search engine

सिंदेवाही तालुक्यात शेकडो गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात शेतीचे कामे केली जाते पाण्याची सुविधा 100% नसल्यामुळे एक फसल वर्षाला घ्यावे लागते धानाचा पीक असल्यामुळे जंगली जनावर खूप मोठ्या प्रमाणात नासाडी सुद्धा करतात मग शेतकऱ्यांची पोटाची भाकर म्हणून कसाबसा काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यात पर्यटकांसाठी दोन गेट चालू करण्यात आले सिंगडझरी आणि शिवनी त्यामुळे लोकांचे जंगलामध्ये फिरायला गेल्यामुळे वाघांना व जंगली जनावरांना जंगलामध्ये शांतपणे रहाता येत नसल्यामुळे वाघ व जंगली जनावरे शहराकडे परिक्रमा करत असल्याचे दिसून येत आहे अनेक दिवसापासून सिंदेवाही  तालुक्यात अनेक रेती घाटावरून जेसीबी मशीन लावून उपसा करून मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि आजही तो प्रकार घाटावरती दिसून येत आहे त्यामुळे पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे आणि त्याचा फटका मुख्यता शेतकरी आणि शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई झाली आहे जंगली जनावरांसाठी नदी-नाल्यांमध्ये पाणी नसल्यामुळे वाघ शहराकडे व गावांमध्ये येऊन पाण्याची व्यवस्था बघत आहे त्यामुळे घरी झोपलेल्या लहान मुलांना व मोठ्या व वृद्ध महिलांना व पुरुषांना वाघ घेऊन जातात मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

शेतकरी व शेतमजूर गावातील व शहरातील जनता वाघ जंगली जनावरांमुळे भयभित झाली आहे त्यामुळे शेतीचे काम व गावाची सुरक्षिततेकरिता आपण नरभक्षक वाघाला या क्षेत्रातून दुसरीकडे पलायन करावे जेणेकरून विद्यार्थी व कामगार शहराकडे शिक्षणासाठी व्यवसायासाठी निर्भीडपणे येऊ शकले पाहीजे पांगडी गेट  व सिंगडझरी गेट लवकरात लवकर बंद करण्यात याव्यात वाघांना जंगली जनावर व शेतकरी आणि संपूर्ण तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार नाही यासाठी नदीतील रेती उपसा बंद करावा.

तालुक्यातील यापुढे कोणताही निष्पाप जीव जाणार नाही यासाठी आपण आपल्या स्तरावरून नवीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनातुन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मिथुन मेश्राम यांनी केली आहे.