नागरिकांना जंगली प्राण्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाय योजना करा….खा. अशोक नेते

0
824
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- ब्रम्हपुरी वन क्षेत्रातील वाढलेल्या जंगली प्राण्यांचे हल्ले वाढले असून यात निष्पाप लोकांचे बळी जात आहे. या बाबत दि.११ जून ला सिंदेवाही येथील विश्रामगृहात खा.अशोकभाऊ नेते, माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर, उपवनसंरक्षक सिंग साहेब व वन अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या वेळी अधिकाऱ्यांना लोकांना सुरक्षित ठेऊन गावाच्या भोतील सोलर लाईट व परिसर स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले.

या वेळी खा.अशोकभाऊ नेते यांनी गावातील लोकांना जंगली प्राण्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी इतर उपाय योजना करण्याच्या वन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या प्रसंगी भाजपा जेष्ठ नेते प्रा.गोपीचंद गणवीर, पं. स सभापती मधुकरराव मडावी, पं.स सदस्य रणवीर दुपारे, भाजपा सिंदेवाही शहर अध्यक्ष किशोर भरडकर,नगर पंचायत उपाध्यक्ष हितेश सूचक, नामदेव लोखेंडे, ACF राजेश्वरी भोंगाळे, RFO गोंड,दिलीप जाधव,यांच्या सह वन अधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.