मा. गांधी तंटामुक्त समिती विरव्हा ने लावला विवाह

0
434
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- तालुक्यातील विरव्हा (जुना) येथील मा. गांधी तंटामुक्त समितीने दि. १२ जून २०१९ बुधवार ला सरडपार येथील कु. सचिन गजानन सावसाकडे याचा विवाह त्याच गावामधील कुमारी पायल जानिक मेश्राम हिच्यासोबत विरव्हा (जुना) येथील ग्राम पंचायत कार्यालय येथे दुपारी १.२० वाजता संपन्न झाला.

या विवाहला मा. गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. रामदास शेंडे, सचिव राजेंद्र सावसाकडे, सरपंच सौ. अंकिता वल्के, उपसरपंच दादाजी ढोक, श्री. गुलाब वाकडे, श्री, रविन्द्र चौधरी, श्री. सुधाकर सावसाकडे, श्री. देवराव वाकडे, श्री. प्रकाश वाकडे, श्री. मनोहर चौके, श्री. मोरेश्वर चौधरी, श्री. आबाजी धारने, श्री. चंद्रहास धारने, श्री. विस्तारी भरडे, श्री. उमाजी चौधरी व सर्व तंटामुक्त गाव समितीचे सदस्य सोबतच गावातील बहुसंख्य पुरुष व महिला उपस्थित होते.