तंटामुक्त जिल्हा मूल्यमापन समितीवर सारंग कराळे

99

अकोट प्रतिनिधी

शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीच्या जिल्हा मूल्यमापन समितीवर सदस्य म्हणून आकोट येथील पत्रकार सारंग गोविंदराव कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला जिल्हा पत्रकार संघाने अकोट तालुक्यातुन
सारंग कराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत जिल्हा माहिती अधिकारी यांना एक पत्र दिले. त्या पत्रावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाने सारंग कराळे यांची नियुक्ती केली आहे. सारंग कराळे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय मराठी पत्रकार परिषदेचे राज्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजूरकर ,जिल्हा सचिव विजय शिंदे, संजय खांडेकर अकोट तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि हरीओम व्यास, सचिव मंगेश लोणकर तथा कीर्तिकुमार वर्मा यांना देत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।