चार वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न….आरोपीस अटक

219
जाहिरात

सिंदेवाही-  तालुक्यातील सामदा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या टेकरी गावातील चार वर्षीय चिमुकल्या मुलीवर चॉकलेटचे अमीष दाखवून आरोपीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी संजय मेश्राम वय ३६ गाव टेकरी याला अटक करण्यात आली आहे.

तालुक्यातील (सामदा ) टेकरी येथे आरोपीचा पानठेला असून, रविवार दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास त्याच्या पानठेल्याच्या परिसरात मुली खेळत होत्या. उन्हाळयाचे दिवस असल्याने सर्वत्र सामसूमच होते. या संधीचा फायदा घेत आरोपीने दुसऱ्या मुलीला घराकडे पाठवले व चार वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमीष दाखवून आपल्या पडक्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असतानाच पीडितीच्या आईने खिडकीतून बघितले. यावेळी आईने धाव घेत मुलीला त्या नराधमाच्या तावडीतून सोडवले व सिंदेवाही पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. चौकशीअंती सिंदेवाही पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड सहिता ३७६ ( ए ), ३७६ (एबी ) पास्को ४ , ६, १० लै.अ.बा.स नुसार गुन्ह्यांची नोंद करून अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।