महात्मा बसवेश्वर संदेश यात्रेचे कडेगांव येथे जल्लोशात स्वागत!!

सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे ‘महात्मा बसवेश्वर संदेश यात्रा २०१९’ चे गुरुवारी लिंगायत समाजाच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा महाराष्ट्रभर प्रसार आणि प्रचार करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे कडेगांव च्या मुख्य मार्गावरून महात्मा बसवेश्वरांची २१ फुटी भव्य मूर्ती असलेला बसव रथ तसेच भालकी येथील लिंगायत मठाने प्रसिद्ध केलेले लिंगायत धर्मावरील साहित्य असणारा हा ‘वचन साहित्य रथाची मिरवणूक काढण्यात आली सध्या बसवेश्वरांचा संदेश घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रथयात्रा भेट देत आहे. हया संदेश यात्रेचे नेतृत्व माजी राष्ट्रपती कै. जत्ती यांचे चिरंजीव आणि बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती आणि स्वतंत्र लिंगायत धर्म चळवळीचे सक्रीय विचारवंत अविनाश भोसीकर करत आहेत. या प्रसंगी बोलताना अरविंद जत्ती यांनी बसवेश्वरांचे तत्वज्ञान हे फक्त अध्यात्मिक नाही तर ते सामाजिक सुद्धा आहे, असे सांगितले. अविनाश भोसीकर यांनी बसवेश्वरांच्या लिंगायत धर्माचे आणि विचारांचे जागरण अत्यंत समाधानकारक पद्धतीने होत असून लिंगायत तसेच इतर धर्मीय लोक उत्साहाने सामील होऊन अगदी रात्री उशिरापर्यंत विचार ऐकण्यासाठी उपस्थित रहात आहेत या बद्दल समाधान व्यक्त केले. सांगली येथील लिंगायत समाजचे नेते प्रदीप वाले या प्रसंगी उपस्थित होते.संदेश यात्रेचे स्वागत कडेगाव येथील बसव ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केले. कडेगाव लिंगायत समाजाचे प्रमुख कार्यवाह व उद्योजक सर्वश्री शिवलिंग माळी, प्रमोद लोखंडे, प्रकाश तडसरे व इतर प्रतिष्टित मंडळीनी या संदेश यात्रेचे स्वागत केले व लिंगायत शरणांचा सत्कार केला. यावेळी दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने लिंगायत समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. कडेगावनंतर ही संदेश यात्रा कराड व उद्या सांगली- मिरज येथे भेट देणार आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।