आदिवासी समाजाला न्याय मिळावे याकरीता शिवसेनेतर्फे तहसिलदार यांना दिले निवेदन

83

सिंदेवाही- नगरपंचायत हद्दीतील आदिवासी समाजाची वडार वस्ती गेल्या ५० ते ६० वर्षापासून प्रभाग क्रमांक १७ मध्ये वास्तव्य करीत आहे तेथील आदिवासी समाजाच्या नागरिकांना आज पर्यंत पूर्णपणे मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.

आज त्या लोकांना फक्त एक हातपंप आहे त्या वस्ती करिता नाली, रोड, विद्युत,सफाई,पुरेसा पिण्याचे पाणी असे अनेक सुविध्येपासुन ही वस्ती वंचित आहे तरी पण नगरपंचायत कडून पाणीपट्टी कर, सामान्य कर, विद्युत कर असे सर्व प्रकारचे कर लावून त्यांच्याकडून कर वसूल केला जात आहे नगरपंचायत ला या सर्व समस्येविषयी २० मे २०१९ ला विद्युत अभियंता सिंदेवाही यांना निवेदन देऊन या सर्व विषयावरती लक्ष घालण्याकरिता व व्यवस्था उपाययोजना करण्याकरिता निवेदन दिले होते परंतु या सर्व बाबीकडे नगरपंचायत तथा विद्युत अभियंता सिंदेवाही यांनी पाठ दाखवली आहे. यावरून असे स्पष्ट दिसते की नगरपंचायत व विद्युत अभियंता सिंदेवाही हे आदिवासी समाजावर पूर्णपणे अन्याय करत आहेत व आम्ही या अन्यायाला खपवून घेणार नाही त्यामुळे येत्या दहा दिवसात नगरपंचायत तथा विद्युत अभियंता यांनी आम्हाला सर्व कामाचा नियोजनासाठी किती दिवस लागणार असे लेखी स्वरुपात द्यावे अन्यथा आदिवासी समाज व शिवसेनेतर्फे नगरपंचायत व विद्युत अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा ईशारा मिथुन मेश्राम यांनी केला आहे व त्याबाबत तहसीलदार अमोल पाठक यांना निवेदन देण्यात आला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।