वरुड मध्ये जल्लोष साजरा-बँडबाजा, फटाके व गुलालाची उधळण – डॉ अनिल बोंडे यांची मंत्रीपदी वर्णी

0
825
Google search engine
Google search engine

कार्यकर्तेमध्ये आनंदाचे वातावरण

*वरुड :-*
मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज भाजप सरकार च्या मंत्रिमंडळात शपथ घेतली, यावेळी वरुड येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी डॉ. अनिल बोंडे यांच्या निवासस्थानी, केदार चौक, सावता चौक, आंबेडकर चौक, बस डेपो येथे ढोल ताशे, गुलालाची उधळण, फटाके फोडून जल्लोष साजरा केला, व सोबतच जरूड ला सुद्धा जल्लोष करण्यात आला. यावेळी वरुडच्या नगराध्यक्ष, शेघाट चे नगराध्यक्ष, भाजप तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष,यांच्यासह सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण डॉ. अनिल बोंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर मोर्शी-वरुड मतदारसंघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.