सेदाणी इंग्लिश स्कूलमध्ये शाळा प्रवेश दिन

0
958
Google search engine
Google search engine

विद्यार्थ्यांनी अनुभवली धमाल गाणी खेळ मजा-मस्तीची अनोखी जंगल सफारी

अकोट ता. प्रतिनिधी

स्थानिक पोपटखेड मार्गावरील सेदाणी इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेतील पहिला दिवस हा शाळा प्रवेश दिन म्हणुन दि.१७ रोजी साजरा करण्यात आला.

शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेश दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो सेदाणी इंग्लिश स्कूलच्या बाल विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी तथा शाळा प्रशासनाद्वारा आनंददायी शिक्षणासाठी अनोखा पद्धतीने हा उपक्रम साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांनी धमाल गाणी खेळ मजा-मस्ती आनंदा सह अनोखी जंगल सफारी घडवत आनंदाने शाळा प्रवेश दिन साजरा केला. यावेळी संस्था अध्यक्ष सौ स्मिता सेदाणी, प्राचार्य विजय भागवतकर , मुख्याध्यापक प्रशांत मंगळे स्नेहल अभ्यंकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कुंकुमतिलक व पुष्पगुच्छ देऊन हसत-खेळत कौतुक करण्यात आले या सोबतच विद्यार्थ्यांना आकर्षक बलुन व चॉकलेट देऊन त्यांना अनोख्या धमाल मजा मस्तीच्या जंगल सफारीवर नेण्यात आले या सफारीत मुलांनी जंगल सफारीचा बेधुंद आनंद घेत विविध प्राणी पक्ष्यांची माहिती घेतली तसेच जंगल सफारी मध्ये विद्यार्थ्यांनी यावेळी वनभोजनाचा मनमुराद आनंद घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांना हा सुखद उपक्रम अनुभवायला मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचे चेहरे हे आनंदाने खुलले होते तर अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी धमाल गाण्यावर ठेका धरला होता. सेदाणी स्कुलमध्ये अवतरलेल्या बाल जगताच्या या आनंद यात्रेचे अनेक पालकांनी कौतुक करत स्वागत केलं तर आनंददायी शाळेमुळे विद्यार्थी हे खुशीत होते शाळा प्रवेशाच्या अनोख्या उपक्रमासाठी उपक्रम प्रमुख जयश्री महाजन व चंचल पितांबरवालेसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी तथा शाळा प्रशासन व स्कूल बस चालक यांनी परिश्रम घेतले.