सिंदेवाही पोलिसांनी आवळल्या दारूतस्करांच्या मुसक्या

0
508
Google search engine
Google search engine

*पाच लाखाच्या मुद्देमालासह दोन आरोपीस अटक*

सिंदेवाही- तालुक्यात सुरु असलेल्या दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदारांनी धाडसत्र सुरु केले आहे. ठाणेदारांच्या या धाडसत्राने तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये मोठी खडबळ उडाली आहे. आज केलेल्या कार्यवाहित पोलिसांनी पाच लाखाच्या मुद्देमालासह दोन आरोपीलाही ताब्यात घेतले.

ठाणेदार निशिकांत रामटेके यांनी दारूविक्रेत्यांविरोधात कंबर कसली असून, धाडसत्र सुरु करुन दारू विक्रेत्यांना जेरबंद करणे सुरु केलेले आहे. सिंदेवाही पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे २० जून २०१९ पहाठे ०१.०० वाजता शिवाजी चौक सिंदेवाही येथे नाकाबंदी केली असता एक पांढ-या रंगाची रिट्स कार क्र. MH-31-DC-1959 नाकाबंदीच्या दरम्यान वाहन न थांबविता  मूल मार्गे पळुन जात असतांना पाठलाग करुन दसरा चौक सिंदेवाही येथे सदर वाहन थांबवुन वाहनाची तपासणी केली असता वाहनात एकून २५ नग खर्ड्याच्या खोक्यात प्रत्येकी १०० नग याप्रमाणे प्रत्येकी ९० एम. एल. ची टायगर ब्रँण्ड कंपनीची देशी दारू  असा एकून २,५०,०००/- रु. ची दारू व मारुती रिट्स कार किंमत २,५०,०००/- रु. असा एकून ५,००,०००/- रु. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व आरोपी १) निखिल दिलीप बांबोळे वय २५ वर्ष आरोपी २) रितेश अमर शेंडे वय २९ वर्ष दोन्ही आरोपी रा. आंबेडकर चौक सिंदेवाही ता. सिंदेवाही यांच्यावर अप. क्र. ३१२/१९ कलम ६५(अ),८३ मदाका सहकलम १८८ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व नमुद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन सदर कार्यवाही पोलिस ठाणे सिंदेवाही येथील पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, गोमेद पाटिल, शरद आवारे, नापोकाँ गणेश मेश्राम यांनी केली सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर हे करीत आहे.