21 जून रोजी आंतरराष्‍ट्रीय योग दिनाचे आयोजन

0
618
Google search engine
Google search engine

पुणे, दिनांक 20-  21 जून हा दिवस आंतरराष्‍ट्रीय योग दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. योग विद्येचा प्रचार व विकास होण्‍यासाठी शैक्षणिक संस्‍था, शाळा, महाविद्यालय, तांत्रिक शैक्षणिक संस्‍था, वैद्यकिय महाविद्यालय तसेच विविध ठिकाणी योग दिवस साजरा करण्‍यासाठी विविध उपक्रम आयोजित करावयाचे आहेत.

त्‍यानुसार दिनांक 21 जुन  2019 या आंतरराष्‍ट्रीय योग दिन साजरा करण्‍यासाठी जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने 5000 ते 7000 जनसमुदायास आमंत्रित करण्‍यात आलेले आहे. त्‍यामध्‍ये माननीय लोकसभा सदस्‍य, विधानसभा सदस्‍य, सर्व आयुक्‍त तसेच शालेय विद्यार्थी, स्‍वयंसेवी संस्‍था व पुणे जिल्‍हयातील सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत,असे प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी कळविले आहे.