चांदूर रेल्वे तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकींचा प्रभाग रचना कार्यक्रमाला सुरूवात

0
865
Google search engine
Google search engine

२ ते ४ जुलै ला विशेष ग्रामसभेत आरक्षणाची सोडत

१३ ते १९ जुलैपर्यंत नोंदविल्या जाणार हरकती

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 

चांदूर रेल्वे तालुक्यातील माहे ऑक्‍टोंबर २०१९ ते जुलै २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या २८ ग्रामपंचायतींचा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे.
प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम सुरू सुरू झाला असुन तहसीलदार यांनी गुगल मॅपवरचे नकाशे करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्यास सुरूवात केली आहे. यानंतर संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्‍चित करणार आहे. यानंतर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण निश्‍चित करण्यात येणार आहे. अनुसुचित जाती, जमातींची (एससी, एसटी) सदस्य संख्या संबंधित ग्रामपंचायतच्या २०११ च्या लोकसंख्येला गृहीत धरून ठरविण्यात येणार आहे. तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) सदस्य संख्या एकुण सदस्यांच्या २७ टक्के असणार आहे. तर एकुण सदस्य संख्येच्या ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे. २,३ व ४ जुलै रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी किंवा विस्तार अधिकारी यापैकी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. यानंतर प्रभागाची रचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे प्राथमिक तपासणी करण्यात येणार असुन प्रस्तावाच्या दुरुस्त्या करून प्रभाग रचना, आरक्षणाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात येणार आहे. यानंतर १३ ते १९ जुलैपर्यंत प्रभाग रचनेला हरकती व सूचना लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात स्विकारल्या जाणार आहे. २९ जुलै रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे होणार असुन प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी हे प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देईल अशी माहिती तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी दिली. या संपुर्ण कार्यक्रमाबाबतीची बैठक नुकतीच तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीला तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी उमक, संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.

या ग्रामपंचायतचा आहे समावेश

घुईखेड, बासलापुर, सावंगा (विठोबा), सावंगा (बुजरूक), जावरा, राजुरा, धानोरा (म्हाली), सोनोरा,  वाई, किरजवळा, निमगव्हाण,  मांजरखेड (दानापूर), बोरी, जवळा, बग्गी, टिटवा, जळका (जगताप),  धानोरा (मोगल), आमला (विश्वेश्वर), सातेफळ, धनोडी, शिरजगाव (कोरडे), सुपलवाडा, सावंगी (मग्रापूर), पळसखेळ  मालखेड, चिरोडी, लालखेड