कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांची वहीतुला करणार – भाजपा, युवा आघाडी

0
580
Google search engine
Google search engine

अमरावती : राज्याचे नवनियुक्त कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे हे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहे. या निमित्त मोर्शी वरूड आणि शेंदुरजनाघाट येथील भाजपा युवा आधाडीने डॉ अनिल बोंडे यांची वहीतुला करण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या दौर्‍यात ठिकठिकाणी डॉ अनिल बोंडे यांचे स्वागत करीता मतदारसंघांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, चाहतावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावेळी स्वागताकरीता येणार्या नी लिखाण वही, बॉन्डबुक, पुस्तके असे कोणतेही शालेयपयोगी साहित्य सोबत आणावे. त्या साहित्याचा वहीतुलेमध्ये समावेश करण्यात येईल.असे युवा आघाडीने कळविले आहे. डॉ अनिल बोंडे यांची वहितूला करून हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल असे भाजपाच्या युवा आघाडीचे मनोज माहुलकर, निलेश अधव, राहुल चौधरी, उमेश गोरडे, रविराज पुरी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. या माध्यमातून जमा होणार्‍या वही पुस्तकांची तुला करून डॉ अनिल बोंडे यांचा एक आगळा वेगळा सत्कार करण्यात येईल. या माध्यमातून जमा होणारे सर्व साहित्य गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.