सिंदेवाही नगपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडनुकीला स्थगीती

0
962
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- २६ जून २०१९ ला नगरपंचायत सिंदेवाहीच्या नगराध्यक्षाची मुदत संपणार आहे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने भाजपचे चार नगरसेवक श्री. योगेश कोकुलवार, सौ. प्रनाली जीवने, श्री. सुरेश पेंदाम व श्रीमती. पुष्पा मडावी यांनी वेगळा गट निर्माण करण्याबाबत दिनांक १३ जून २०१९ ला अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे दिला त्यानंतर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष महारष्ट्र शासन प्राधीनिकरण सदस्य अनहरता नियम १९८७ कलम ३(१) मध्ये नमुद तरतुदीमध्ये निवडनुक निकाल जाहिर झाले नंतर तिस दिवसाच्या आत गट/आघाडी/फ्रंट स्थापन करण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र शासन प्राधीनिकरण सदस्य अनहरता अधिनियम १९८६ आणि महाराष्ट्र स्थानिक प्राधिनिकरण  सदस्य अनहरता अधिनियम १९८७ अन्वय स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नगरपंचायतचा समावेश नाही सबब नगरपंचायत सिंदेवाही यांना गट किवा वेगळा गट स्थापन/निर्माण करता येणार नाही करीता आपल्याकडुन विषयांकित प्रकरनाचे अर्ज जिल्हाधिकारी यांनी ख़ारिज केले आहे त्यानुसार नगराध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडनुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे. शहरात निवडनुकीदरम्यान नगरपंचायत परिसरात वातावरण तापल्यामुळे पोलिस स्टेशन सिंदेवाहीचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी दंगा नियंत्रक पथक व पोलिस बंदोबस्त चोक ठेवला होता त्यामुळे होणारा वातावरण शांत झाला. शांतता व सुवेवस्था ठेवण्यासाठी पोलिसांनी अतोनात प्रयत्न केला शेवत वातावरण शांतमय झालेला आहे. निवडनुक स्थगित झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदअधिकारी व कार्यकर्ता यांनी फटाके फोडुन व मिठाई वाठुन आनंद व्येक्त केला.

 

मा. प्रा. अतुल देशकर माझी आमदार तथा माझी जिल्हाअध्यक्ष भाजपा यांनी मटले की, नगराध्यक्ष व उपाध्यक्षचा  अडीच वर्षाचा कार्यकाल संपलेला होता परन्तु भाजपचे चार नगरसेवक कांग्रेसने आर्थिक प्रलोभन देऊन स्वत:कडे पळवुन नेले आशाप्रकारे राजकारण करत असतील तर आम्ही सुद्धा मांगे-पुढे पाहणार नाही. आज याठिकाणी स्थगना आदेश प्राप्त झालेला आहे त्यामुळे मंत्रलायाच्या आदेशाचा पालन आम्ही करीत आहो आणि अम्ह्चे चार नगरसेवक त्यांनी पक्षात येउन काम करावे होच अपेक्षा आहे.

 

मा. रमाकांत लोधे तालुका अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेठी सिंदेवाही तथा जीप सदस्य यांनी मटले की, भाजपाचे चार नगरसेवकांनी वेगळा गट निर्माण करुन कांग्रेस च्या गटला समर्थन देण्याचे दर्शविले यात कसल्याही प्रकारचा आर्थिक व्येवहार व नगरसेवकांना पडवुन नेण्याचा आरोप हा खोटा आहे हा अम्ह्च्या पक्षाला बदनाम करण्याचा शरयंत्र दिसतोय.