बाळापूर पोलिसांनी विहरीतून काढली बेवारस मोटारसायकल

0
833

मोटरसायकल चोरीची असल्याचा संशय

अकोलाः प्रतिनीधी
बाळापूर चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना माहिती मिळाली की बाळापूर शहराच्या जवळील जवळा रोड लगत असलेल्या एका शेतातील विहरीत एक लाल रंगाची मोटारसायकल दिसून येत असून तिचा अर्धा भाग पाण्यात बुडालेला दिसत आहे, शेळके ह्यांनी त्वरित सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जयवंत शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल गिरीश वीर ह्यांना सदर मोटारसायकल बाहेर काढण्या बाबत आदेश देऊन रवाना केले, सदर विहरी मध्ये खाली उतरण्या ची काही सोय नसल्याने नागरिकांच्या मदतीने दोर टाकून सदर मोटारसायकल बाहेर काढली असता CD डीलक्स कंपनीची लाल रंगाचे नंबर प्लेट नसलेली जीचा चेसिस नंबर MBLHAIIENASA01680 असा असून इंजिन नंबर HA II EB99M11739 असा असल्याचे दिसून आले, सदर मोटारसायकल चोरीची असल्याचा संशय असल्याने पुढील चौकशी कामी सदर मोटारसायकल बाळापूर पोलिस स्टेशन मध्ये डिटेन करून ठेवण्यात आली असून अकोला जिल्ह्यातील सर्व ठाणेदार ह्यांना माहिती देण्यात आली आहे.