*मध्यप्रदेश मधील वाळू महाराष्ट्र मध्ये कायदेशीर कशी,?पोलिस विभाग आणि महसूल भूमिका संशयस्पद* *हजारो टन च्या वर होत आहे रोज वाहतूक*

0
665
Google search engine
Google search engine

 

*मध्यप्रदेश मधील वाळू महाराष्ट्र मध्ये कायदेशीर कशी,?पोलिस विभाग आणि महसूल भूमिका संशयस्पद*
*हजारो टन च्या वर होत आहे रोज वाहतूक*

बादल डकरे अमरावती

मध्ये प्रदेश मधून वाळूची तस्करी महाराष्ट्र मध्ये होत असून या मध्ये अनेक राजकीय नेते,दोन्ही राज्यातील अधिकारी,यांची संगनमत होत असल्याचे दिसत आहे. तर याच्या वर कार्यवाही कोण करणार आता याकडे लक्ष लागले आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी हे पोलीस स्टेशन मध्यप्रदेश च्या सीमेवर असून आणि मागील एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू आहे.यामध्ये चोरट्या मार्गाचा अवलंबुन करून ही वाहतूक होते आहे. तर या कडे चांदुर बाजार चे तहसीलदार पोलीस विभाग दुर्लक्ष करीत आहे.मात्र त्यांच्या दुर्लक्ष करण्याचे कारण अद्यापही गुलदस्यात आहे.
मध्ये प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असलेल्या आरटीओ चा चेक पोस्ट ला चुकून अवैध पणे वाळूची वाहतूक होत आहे. मात्र या कडे शिरजगाव कसबा पोलीस, ब्राम्हणवाडा थडी पोलीस, आणि चांदुर बाजार पोलीस हे काहीच कार्यवाही करीत नसल्याचे दिसून येत आहे.तर मागील काही दिवसांपूर्वी ब्राम्हणवाडा थडी या ठिकाणी वाळूची वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी आणि आरटीओ अधिकारी यांनी कडून अडविण्यात आले मात्र या ठिकाणी अधिकारी यांनी प्रकरण मध्ये कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे प्रकरण शांत झाले मात्र वाळूची वाहतूक ही सुरूच असल्याने आता अमरावती जिल्हा प्रशासन या कडे या सर्वांवर कार्यवाही चा भर राहणार हे मात्र नक्की.