अवैध धंदे वर कार्यवाही होणार ? ग्रामीण अधिक्षक यांच्या माध्यमातून केली जाणार कार्यवाही.?

0
755
Google search engine
Google search engine

अवैध धंदे वर कार्यवाही होणार ?
ग्रामीण अधिक्षक यांच्या माध्यमातून केली जाणार कार्यवाही.?

बादल डकरे

सध्या चांदुर बाजार तालुक्यातील चांदुर बाजार,आसेगाव ,शिरजगाव कसबा, ब्राम्हणवाडा या पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावा मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी तसेच देशी विदेशी दारू,अवैध वरली मटका,अवैध जनावर वाहतूक ,अवैध गौवंश मास विक्री,अवैध सागवान तस्करी,अवैध वाळू ,अवैध पाने गुटखा विक्री ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे.या वर कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभाग शांत असल्याने हे अवैध धंदे करणारे आता शहराचे किंग बनले आहे.तर यांच्या मुळे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावामध्ये कायदा सुव्यवस्था चा प्रश्न उभा राहणार असल्याचे दिसत आहे.

पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे करणारे यांच्या पासून दर महिन्याला वसुली होत असल्याचे स्पस्ट आहे.या मध्ये वाळूची तस्करी करणाऱ्या कडून महिन्याला प्रति ट्रॅक्टर 12000,अवैध गावठी दारू विक्री महिन्याला रुपये 3000,अवैध वरली मटका महिण्याला 30000 रुपये,अवैध गुटखा विक्री महिन्याला 20000 ,अवैध जनावर तस्करी महिण्याला 20000 ते 25000 तसेच अवैध सागवान तस्करी करणारे यांच्या कडून महिन्याला 20000 ते 30000 वसुली केली जात आहे.यांची एकूण बेरीज केली असता जवळपास लाखाच्या वर जाणाऱ्या या अवैध कमाई मुळे पोलीस विभाग अवैध धंदे करणार्यांवर कार्यवाही करीत नसल्याचे स्पस्ट होते आहे.

या अवैध धंद्या मध्ये अनेक राजकीय पक्षचे किंवा नेत्याच्या जवळ असणारं लोक समाविष्ट असल्याने यांच्यावर पोलीस विभाग किंवा इतर कोणाची वचक न राहिल्याने हेच पुढे कायदा आणि सुव्यवस्था चा प्रश्न तयार करणार असल्याचे चित्र सद्या चारही पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील होत असलेल्या अवैध धांदयवरून दिसून येते.तर या सर्वां ग्रामीन अधीक्षक यांचे स्पेशल स्कॉड आणि स्थानिक गुन्हे शाखा ही कार्यवाही करतील?मात्र अजूनही मोठ्या किंग पर्यत पोहचण्याचा स्थनिक गुन्हे शाखेला स्थानिक पोलीस स्टेशन प्रमाणे यश आले नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे आता या वर कोण कार्यवाही करणार हा प्रश्न आहे.