दोन राज्याच्या सीमेवर 4 वर्षांपासून उत्खनन, कायदेशीर सांगून बेकायदेशीर पणे होत आहे उत्खनन कार्यवाही करण्यासाठी अधिकारी यांची भूमिका स्पष्ट नाही.जिल्हाधिकारी करणार का कार्यवाही?

0
616
Google search engine
Google search engine

दोन राज्याच्या सीमेवर 4 वर्षांपासून उत्खनन, कायदेशीर सांगून बेकायदेशीर पणे होत आहे उत्खनन
कार्यवाही करण्यासाठी अधिकारी यांची भूमिका स्पष्ट नाही.जिल्हाधिकारी करणार का कार्यवाही?

बादल डकरे :- काजळी देऊरवाडा

दोन राज्याच्या सीमेवर उत्खनन करून लाखो रुपये चा महसूल बुडविला जात आहे. तर यामध्ये चांदुर बाजार तहसील चे अनेक अधिकारी हे उत्खनन करणाऱ्या सहरकार्य करीत आहे तर एक परवाना मिळविण्यासाठी तहसिल कार्यलय पैसे दिले जात आहे.त्यामुळे उत्खनन करणारे हे कुठल्या प्रकारच्या कायदेशीर बाबीची पूर्तता करत नसले तरी त्यांना उत्खनन आणि वाहतूक चा परवाना मिळत आहे आहे.मात्र या ठिकाणी पर्यावरण संरक्षण च्या बाबीची कुठलीही पूर्तता केली जात नाही आहे.
तर मागील तीन वर्षात कार्यरत असणारे तहसीलदार यांनी सुद्धा याच्या कार्यवाही केली नाही.त्यामुळे आता कार्यवाही साठी जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार.
महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेश लगत असलेल्या मुरूम खदान मधुन मागील 3 ते 4 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर उत्खनना सुरू असून या ठिकाणी कोणत्याही पर्यावरणीय बाबीची पूर्तता केली जात नाही आहे. तर ज्या ठिकाणी उत्खनन सुरू आहे त्या ठिकाणी वरून चोरट्या मार्गानी परतवाडा या तालुक्यात वाहतुक होते आहे.या मध्ये ना अचलपूर परतवाडा येथील तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी कार्यवाही करीत आहे.ना चांदुर बाजार चे तहसीलदार काही कार्यवाही करीत आहे.
अमरावती येथील जिल्हाधिकारी शैलेश नवाल या वर कार्यवाही करून या सर्वाला मदत करणाऱ्या तहसीलदार, आणि इतर अधिकारी यांच्या वर काय कार्यवाही करणार हे पाहावे लागतील.