महावितरणच्या तक्रार निवारण केंद्रावर शिवसैनिकांची धडक – सदोष विज पुरवठ्या विरोधात आक्रोश

0
619

अमरावती (प्रतिनिधी):- गेल्या दोन महिन्यापासून परिसरात होत असलेल्या सदोष विज पुरवठ्याच्याविरोधात शिवसैनिक व नागरिकांनी न्यु कॉटन मार्केट विद्युत तक्रार निवारण केंद्रावर धडक देवून अधिकाऱ्यांना जाब विचारला. सोबतच हा विजेचा लपंडाव न थांबविल्यास उग्र आंदोलन करण्याची इशारासुध्दा यावेळी देण्यात आला.
न्यु कॉटन मार्केट विद्युत तक्रार निवारण केंद्राअंतर्गत भिवापुरकर नगर, सरस्वती नगर, प्रवीण नगर, लक्ष्मी नगर, संतोषी नगर, शोभा नगर, महेंद्र कॉलनी परिसर व ईतर भागात वारंवार विज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार चालत आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या या प्रकारामध्ये उन्हाळ्यात मेंटनन्सच्या नावावर विज पुरवठा खंडीत केल्या जात होता. तेव्हा मोबाईल ब्रेकडाऊनच्या मॅसेजसुध्दा येत होता. मात्र, मॅसेजमध्ये देण्यात येणाऱ्या वेळेपेक्षा अधिक काळ विज पुरवठा बंद राहायचा. भर उन्हाळ्यात केल्या जात असलेल्या या ब्रेकडाऊनमुळे लहान बालक, आजारी व्यक्ती व वृध्दांसह सर्वांना खुप त्रास सहन करावा लागला. याबरोबर विजेवर अवलंबून असलेले परिसरातील आईक्रीम विक्रेते व अन्य व्यापाऱ्याना नुकसान सहन करावे लागले. आता थोडासा वारा आणि पाऊस येताच लगेच लाईन बंद करण्यात येते. आता झाडे तोडण्याच्या कारणावरुन दिवस दिवसभर विजेचा लपंडाव सुरुच असतो. वारंवार होत असलेल्या या विजेच्या लपंडावाला कंटाळून शिवसेनेचे उपशहर प्रमुख आशिष ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक व नागरिकांनी तक्रार निवारण केंद्रावर धडक दिली. माहिती मिळताच सहाय्यक अभियंता अंधारे केंद्रात पोहचले. थोड्या वेळ चर्चा झाल्यानंतर ठाकरे यांनी परिस्थीती न सुधारल्यास सदोष विज पुरवठा विरोधात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला व गेलेला वीज पुरवठा तात्काळ सुरु करवून घेतला. यावेळी प्रणय डांगे, संकेत गडवाल, गोविंदा जिजनकर, पराग नवलकर,प्रज्वल फोफारे, आकाश गाडे,यशवंत बोरकर,शुभम कोठारे, संदीप हाडोळे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते तर मोठ्या संख्येने परीसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
भ्रमणध्वनी व्यस्त
विज पुरवठा खंडीत झाल्यावर न्यु कॉटन मार्केटच्या विद्युत तक्रार निवारण केंद्रवार नागरिकांव्दारा वारंवार कॉल केल्यावर तेथील भ्रमणध्वनी व्यस्त येतो. विद्युत पुरवठा खंडीत केल्यावर नागरिकांच्या तक्रारीला वारंवार उत्तर द्यावे लागत असल्याने तेथील कर्मचारी चक्क भ्रमणध्वनी बंद करून बाजुला ठेवत असल्याने हा भ्रमणध्वनी व्यस्त येतो आणि लागला तर मोबाईल नंबर कुणी रिसीव्ह करीत नाही.